Comedian tried to commit suicide : कपिल शर्मासोबत काम केलेला कलाकार प्यायला विष, हे होतं कारण...

Comedian tried to commit suicide सुप्रसिद्ध कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंद रावने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल आहे. तीर्थानंदला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांना त्याचे प्राण वाचण्यात यश आले आहे.

Tirthanand Rao
तीर्थानंद राव   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • तीर्थानंद रावने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
  • डॉक्टरांना त्याचे प्राण वाचण्यात यश
  • तीर्थानंद राव याने सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शम्रासोबत कॉमेडी सर्कस के अजूबे या कार्यक्रमात काम केले आहे.

Comedian tried to commit suicide : मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंद रावने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल आहे. तीर्थानंदला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांना त्याचे प्राण वाचण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीर्थानंदकडे काहीच काम नव्हते. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलण्याचे तीर्थानंदने म्हटले आहे. (comedian Tirthanand Rao work with kapil sharma tried to commit to suicide )

म्हणून आत्महत्येचे उपचले पाऊल

विष प्राशन करून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तीर्थानंदने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीर्थानंदची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कुटुंबीयांनीही आपल्याला सोडले असल्याचे तीर्थानंदने म्हटले आहे. जेव्हा तीर्थानंद रुग्णालयात दाखल होता तेव्हा त्याची आई आणि भाऊ त्याला भेटायलाही आले नव्हते. तीर्थानंद आणि त्यांचे कुटुंबीय एकाच सोसायटीमध्ये रहातात पण ते त्याच्याशी बोलत नाहीत. रुग्णालयातून आल्यानंतरही तो एकटाच राहत आहे.  या सर्वांना कंटाळून तीर्थानंदने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

बायकोने केल दुसरे लग्न

तीर्थानंदच्या बायकोने त्याच्याशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे. तीर्थानंदला एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. तिच्याशी काहीच संपर्क नसल्यानेही तीर्थानंद दुखात होता. सध्या तीर्थानंद कामाच्या शोधात असून कौटुंबिक समस्यांचा सामना करत आहे. एका हातात काम नाही आणि कुठलाही कौटुंबिक आधार नसल्याने तीर्थानंद निराश आहे. यामुळेच तीर्थानंदने आयुष्य संपवण्याचा निर्यण घेतला होता. आता या घटनेतून वाचल्यानंतर आपण पुन्हा असे पाऊल उचलणार नसल्याचे तीर्थानंदने म्हटले आहे. तीर्थानंदचे कुटुंबीय त्याच्याकडे लक्ष देत नाही यावरून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. 


कपिल शर्मासोबत केले काम

तीर्थानंद राव याने सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शम्रासोबत कॉमेडी सर्कस के अजूबे या कार्यक्रमात काम केले आहे. २०१६ साली एका एपिसोडमध्ये राव यांनी श्वेता तिवारी आणि कपिल शर्मासोबत काम केल्याचे त्याने सांगितले आहे. त्यावेळी कपिल आणि सुनील ग्रोवरमध्ये भांडणे झाली होती, तेव्हा कपिलने तीर्थानंदला एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फोन केला होता. परंतु तीर्थानंद एका गुजराती चित्रपटात काम करत असल्याने शक्य झाले नाही. आता तब्येत ठीक झाल्यानंतर कपिलकडे काम मागेन असे तीर्थानंदने म्हटले आहे.

निर्मात्यांनी पैसेच नाही दिले

गेल्या १५ वर्षांपासून आपण सिनेसृष्टीत काम करत असल्याचे तीर्थानंद यांनी सांगितले आहे. पण सध्या आपल्याकडे काम नसल्याचे तीर्थानंदने म्हटल आहे. अभिनयामुळेच आपण खूप काही शिकलो, अभिनयातूनच खूप पैसे कमावले पण आता मी पुन्हा शुन्यावर आलोय असे तीर्थानंदने म्हटले आहे. मी नाना पाटेकर यांची मिमिक्री करतो त्यामुळे मला लोक नाना पाटेकरचा डुप्लिकेट समजातात आणि माजी प्रशंसा करतात असे तीर्थानंदने म्हटले आहे. तीर्थानंदने एका वेब सीरीजमध्ये काम केले होते, परंतु निर्मात्याने आपले पैसेच दिले नसल्याचे तीर्थानंदने सांगितले. आता आपण पुन्हा कामावर लक्ष देणार आणि पुन्हा आत्महत्येचा विचार करणार नसल्याची कबुलीही तीर्थानंदने दिली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी