Chala Hawa Yeu Dya: तब्बल 8 वर्षानंतर 'चला हवा येऊ द्या' मध्ये खूप मोठा बदल, श्रेयानंच सांगितलं सारं काही...

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 27, 2022 | 13:20 IST

Shreya Bugde New Post: चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोनं सर्वांच्या मनात घर निर्माण केलं आहे. आता चला हवा येऊ द्या टीमसाठी एक स्पेशल दिवस आला आहे. तब्बल 8 वर्षानंतर हा दिवस उजाडला आहे.

Shreya Bugde
श्रेया बुगडे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोनं सर्वांच्या मनात घर निर्माण केलं आहे.
  • गेल्या 7 वर्षांहून अधिक काळापासून हा कॉमेडी शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
  • तब्बल 8 वर्षानंतर हा दिवस उजाडला आहे.

 मुंबई: Chala Hawa Yeu Dya New Set Shooting: झी मराठीवरील (Zee Marathi)  चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोनं सर्वांच्या मनात घर निर्माण केलं आहे. गेल्या 7 वर्षांहून अधिक काळापासून हा कॉमेडी शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस या कॉमेडी शोची लोकप्रियता वाढत गेली. सात वर्षानंतरही या शोला तशीच पसंती मिळते. मात्र आता चला हवा येऊ द्या टीमसाठी एक स्पेशल दिवस आला आहे. तब्बल 8 वर्षानंतर हा दिवस उजाडला आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेनं (Actress Shreya Bugde) या संदर्भातली माहिती दिली आहे. 

श्रेया बुगडेनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांना थुकरटवाडी टीमबद्दलची (Thukaratwadi Team) ही गुड न्यूज शेअर केली आहे. ही गुड न्यूज (Good News) अशी आहे की, 8 वर्षांनी चला हवा येऊ द्या टीम एका नव्या वास्तूत प्रवेश करणार आहे. या निमित्तानं शोची सर्व टीम आज एकत्र आली. टीमनं या नव्या वास्तूत शूटिंगचा श्री गणेशा केला आहे. 

अधिक वाचा- मोठी बातमी: भाजप नेत्याची तलवार, कुऱ्हाडीनं हत्या

श्रेयानं पोस्टमध्ये लिहिलं की, “तब्बल ८ वर्षांनी ,नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे”


सोशल मीडियावर या शोच्या टीमचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. या कॉमेडी शोमध्ये कलाकार एकापेक्षा एक विनोदी अभिनय करतात. दर एपिसोडमध्ये कलाकारांच्या अभिनयाचा कहर पाहायला मिळतो. शो जेव्हापासून सुरू झाला तेव्हा या सगळ्याच कलाकारांची गट्टी जमली. यांच्यात एक कौटुंबिक नातं निर्माण झालं आहे. यांच्यातील ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन मजा मस्ती नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळते. 

डॉ. निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि नव्यानं टीममध्ये जॉईन  झालेले अनेक कलाकार मिळून या कॉमेडी शो चार चांद लावतात. आता ही टीम नव्यानं उभारलेल्या सेटवर काय धमाल मस्ती घेऊन येतात याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी