Kaali Poster Row: माँ कालीच्या हातात सिगरेट बघून संतापले नेटकरी, सिनेमाच्या पोस्टरवरून कॅनाडात गदारोळ

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 09:40 IST

उच्चायुक्तांनी जारी केलेल्या निवेदनात, कॅनडाचे अधिकारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना 'अशी सर्व प्रक्षोभक सामग्री काढून टाकण्याचं' आवाहन करण्यात आलं आहे.

Kaali poster
काली सिनेमाच्या पोस्टरवरून वाद 
थोडं पण कामाचं
  • काली सिनेमाच्या पोस्टरवरचा वाद चिघळला आहे.
  • या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं बोललं जात आहे.
  • अनेकांकडून लीना यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.


नवी दिल्ली: काली सिनेमाच्या पोस्टरवरचा वाद चिघळला आहे. या पोस्टरच्या वादात कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी उडी घेतली आहे. भारतीय उच्चायुक्तानं हस्तक्षेप करत एक निवेदन जारी केलं आहे. उच्चायुक्तांनी जारी केलेल्या निवेदनात, कॅनडाचे अधिकारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना 'अशी सर्व प्रक्षोभक सामग्री काढून टाकण्याचं' आवाहन करण्यात आलं आहे. 

सिनेनिर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या सिनेमाच्या या पोस्टरला भारतात प्रचंड विरोध होत आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये माँ कालीच्या वेषात एक महिला सिगरेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं बोललं जात आहे. अनेकांकडून लीना यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

उच्चायुक्तालयाकडून निवेदन जारी

ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितलं की, आम्हाला कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. सिनेमाच्या पोस्टरमुळे हिंदू देवतांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. 'अंडर द टेंट' प्रोजेक्टचा भाग म्हणून टोरंटो येथील आगा खान संग्रहालयात हा सिनेमा दाखवण्यात आला.

अधिक वाचा- राज्यावर अस्मानी संकट, कोकणासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा;  जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

प्रेस रिलीझमध्ये पुढे म्हटलं आहे की, टोरंटोमधील आमच्या वाणिज्य दूतावासाने कार्यक्रमाच्या आयोजकांना या चिंता आणि तक्रारी कळवल्या आहेत. आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की, कॅनडातील अनेक हिंदू गटांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली असून अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आहे. आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना अशी सर्व प्रक्षोभक सामग्री काढून टाकण्याची विनंती करतो, असं निवेदनात म्हटलं आहे.

सिनेनिर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्यावर कारवाई करा

सिने निर्मात्याने सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. त्यानंतर ती नेटिझन्स भलतेच संतापले. सोशल मीडिया यूजर्संनी आगा खान म्युझियमला ​​हा सिनेमा तात्काळ हटवण्यास सांगितलं. या संग्रहालयातच हा सिनेमा दाखवण्यात आला. त्याचबरोबर सिने निर्मात्या लीनानं लोकांना सांगितले आहे की, तिच्यावर दोषारोप करण्यापूर्वी लोकांनी प्रथम सिनेमा पाहावा.

अधिक वाचा- Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी, प्रवाशांची तारांबळ

तक्रार दाखल

वादग्रस्त पोस्टरमुळे झालेल्या गदारोळानंतर आता लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. लीना मनिमेकलाई यांच्या वादग्रस्त पोस्टरबाबत दिल्लीतील एका वकिलानं ही तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी