चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआरने (RRR) भारताला पुन्हा एकदा अभिमान वाटावा अशी संधी दिली. आरआरआर या चित्रपटाचे जगभरातून कौतुक आणि प्रशंसा होत आहे. आता चित्रपटाने क्रिटिक्स चॉइस अवार्ड्स 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, आरआरआर चित्रपटाने क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा पुरस्कार जिंकला आहे (Best Foreign Language Film).
नुकत्याच झालेल्या २८व्या क्रिटिक्स चॉइस अवार्ड्समध्ये आरआरआर चित्रपटाची प्रशंसा झाली. क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्सच्या ट्विटर हँडलवरून या गोष्टीची घोषणा करण्यात आली आहे. आरआरआर चित्रपटाला अजून एकदा यश मिळाले म्हणून त्यांचे चाहते खूप खुश आहेत. आरआरआरच्या टीमचे सदस्य एकमेकांचे अभिनंदन करत आहेत तसेच चाहत्यांचे आभार मानत आहेत.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सचे आयोजक ट्विटरवर असं म्हणाले आहेत की, "आरआरआर च्या सर्व कलाकारांचे आणि क्रूचे सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन. आरआरआर हा चित्रपट या पुरस्काराचा विजेता ठरला आहे. या पुरस्कार सोहळ्यात आरआरआर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ज्युनियर एनटी आर आणि रामचरण यांनी यापूर्वी "नाटू नाटू" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकला होता.
चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने पुरस्काराचा स्वीकार करताना म्हणाले, " माझ्या आयुष्यात असलेल्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानतो. एस.एस. राजामौलीने आई, पत्नी आणि कॉस्च्युम डिझायनर राम राजामौली यांचे आभार मानले. आपल्या आईबद्दल बोलताना ते म्हणाले की, " माझा आईने मला कथा, कॉमिक्स वाचण्याची गोडी लावली. या सगळ्यांचा मनोरंजनसृष्टीत काम करताना फायदा होत असल्याचे राजामौली म्हणाले.
आरआरआर चित्रपट हा २०२२ मध्ये चित्रपटगृहात आला आणि सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि अॅक्शन सीन्स लोकांना खूप आवडले होते, आता हा चित्रपट जागतिक स्तरावरही भारताचे नाव उंचावत आहे.