फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा, अज्ञात माणसाने मारला होता गुद्दा

झगमगाट
Updated Apr 27, 2021 | 17:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

फातिमा सना शेखने एका मुलाखतीच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती कशा प्रकारे एका व्यक्तीच्या छळाचा बळी ठरली होती. 

fatima sana sheikh
दंगल गर्ल फातिमा सना शेखचा धक्कादायक खुलासा 

थोडं पण कामाचं

  • फातिमा सना शेखला चालता चालता एका व्यक्तीने स्पर्श करण्यासाठी गुद्दा मारला होता
  • फातिमा सना शेखने घेतला सोशल मीडियातून ब्रेक
  • फातिमा टॉक्सिक रिलेशनशिपची शिकार ठरली होती. 

मुंबई: दंगल गर्ल म्हणजेच फातिमा सना शेख अनेकदा सोशल मीडियावरील आपल्या फोटोज आणि व्हिडिओजमुळे चर्चेत असते. तसेच ती आपल्या पर्सनल लाईफशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असते. फातिमाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की ती कशा प्रकारे एका व्यक्तीच्या शोषणाची शिकार झाली होती. 

एका एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना फातिमाने या अपघाताचा खुलासा केला. तिने सांगितले की एका व्यक्तीने तिला स्पर्श करण्यासाठी गुद्दा मारला होता. फातिमाने सांगितले की ती जिममधून घरी परतत होती. त्यावेळेस एक व्यक्ती बऱ्याच वेळेपासून तिच्याकडे सतत बघत होती. 

फातिमाच्या मते, मी त्याचा सामना केला आणि विचारले की असा का बघत आहेस. तेव्हा लाज न बाळगता तो म्हणाला ही माझी इच्छा आहे. मी त्याला म्हटले तुला कानाखाली खायची इच्छा आहे का यावर त्याने उत्तर दिले की हा मला कानाखाली मार. 

Actress Fatima Sana Shaikh is grabbing all attention for her Instagram  pictures...- The Etimes Photogallery Page 26

जोरदार गुद्दा मारला

फातिमा सना शेखने सांगितले की, जेव्हा मी त्याला कानाखाली मारली तेव्हा त्याने मला जोरदार गुद्दा मारला. मी तिथेच बेशुद्ध झाले. यानंतर लगेचच मी याची माहिती माझ्या वडिलांना फोनद्वारे दिली. ते तातडीने आपल्या मित्रांसोबत तेथे पोहोचले. माझे वडील आणि त्यांच्या मित्रांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांना विचारले की कोणी माझ्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. फातिमा म्हणाली, माझे वडील खूप स्ट्राँग आहेत तेच माझी सगळ्यात मोठी ताकद आहेत. 

Insta – InUth

रिलेशनशिपमध्ये राहिलीये फातिमा सना शेख

फातिमा सना शेखने याआधी आपल्या टॉक्सिक रिलेशनशिपचा खुलासा करताना सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला होता. तिने सांगितले की ती टॉक्सिक रिलेशनशिपची शिकार ठरली होती. दंगल गर्ल म्हणाली, जेव्हा महिला या पीरियडमध्ये असतात तेव्हा त्यातून बाहेर निघणे खूप कठीण असते. खासकरून जेव्हा तुम्ही काम करत नसता आणि आर्थिकरित्या आपल्या पतीवर अवलंबून असता तेव्हा त्यातून बाहेर पडणे खूप कठीण असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी