Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची एंट्री; सुंदरलाल लाडक्या बहिणीसोबत पोहचला गोकुळधामला 

झगमगाट
Updated Jun 15, 2022 | 09:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah । 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे.

Dayaben's royal entry in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची जोरदार एंट्री  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची जोरदार एंट्री.
  • तब्बल ५ वर्षांनंतर सुंदरलाल आपल्या बहिणीला अहमदाबादहून मुंबईला घेऊन आला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah । मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. 'हम सबकी प्यारी दया भाभी' हा शो ५ वर्षांनंतर परतला आहे. सुंदरलाल स्वत: बहिणीसोबत गोकुळधाम सोसायटीत पोहोचला आहे. या आनंदाच्या बातमीने सोसायटीतील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. जेठालालचे तर हसू देखील लपून राहिले नाही. तसेच बापूजीही आपल्या मुलीसारख्या सुनेला घेण्यासाठी सोसायटीच्या बाहेर आले आहेत. (Dayaben's royal entry in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma). 

अधिक वाचा : मुंबईत जुहू बीचवर तिघे बुडाले

टप्पूच्या आईची जोरदार एंट्री

तारक मेहतामध्ये दयाबेनची एन्ट्री झाली आहे. तब्बल ५ वर्षांनंतर सुंदरलाल आपल्या बहिणीला अहमदाबादहून मुंबईला घेऊन आला आहे. त्यामुळे आगामी एपिसोड्समध्ये तुम्हाला सुंदरलाल संपूर्ण सोसायटीला दयाबेनच्या आगमनाची गोड बातमी देताना दिसेल. जेठालाल तर सुंदरला प्रेमाने मिठी मारत आहे, त्याला दयाला कधी भेटतोय याची मोठी प्रतिक्षा लागली आहे. सोसायटीतील बाकीचे लोकही दया भाभीसाठी आरतीचे ताट घेऊन बसले आहेत. टप्पूच्या आईचे जोरदार स्वागत करण्यासाठी लोक आतुर झाले आहेत.

पण जरा थांबा... जिथे सुंदरलाल आहे तिथे काहीही गडबड होणार नाही असे कसे होईल. त्यामुळे शोच्या प्रोमो व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, सुंदरलाल जेठालालला त्या वाहनाजवळ जाण्यापासून थांबवतो ज्यामध्ये दयाबेन बसली असल्याचा दावा केला जात आहे. जेठालाल त्याची दया पाहण्यासाठी आतुर आहे आणि सुंदरला यावर विश्वासही बसत नाही. दया स्वतः या गाडीतून खाली उतरेल असे सुंदर सांगत आहे आणि सर्व गोकुळधामवाले आतुरतेने या क्षणाची वाट पाहत आहेत. 

दिशा वकानी झाली आहे आई

लक्षणीय बाब म्हणजे अलीकडेच असित मोदीने दयाबेनच्या शोमध्ये परतण्याची घोषणा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन्सही घेतल्या जात होत्या, त्यामुळे एवढ्या लवकर एखाद्याला शोमध्ये कास्ट करणे त्यामुळे चाहत्यांना याच्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जात आहे. २०१७ पर्यंत या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतरच दयाबेनचे पुनरागमन होणार या चर्चेला उधान आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी