Happy Birthday Deepika Padukone : आज आहे दीपीका पदुकोणचा वाढदिवस, हे सुपरहिट चित्रपट दीपिकाने नाकारले होते 

आज सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोणचा वाढदिवस आहे. दीपिका आज वयाचे ३६ वे वर्ष पूर्ण करत आहे.  २००७ साली आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

थोडं पण कामाचं
  • दिपीका पदुकोणचा वाढदिवस आहे.
  •  २००७ साली आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
  • दीपीकाने अनेक चित्रपटांना नकार दिला आणि ते चित्रपट सुपरहिट ठरले होते.

Deepika Padukone Birthday : आज सुप्रसिद्ध अभिनेत्री दिपीका पदुकोणचा वाढदिवस आहे. दीपिका आज वयाचे ३६ वे वर्ष पूर्ण करत आहे.  २००७ साली आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही. असे असले तरी दीपीकाने अनेक चित्रपटांना नकार दिला आणि ते चित्रपट सुपरहिट ठरले होते. 


धूम ३


अभिषेक बच्चन, उदय चोपडा, कटरिना कैफ आणि आमिर खान अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या धूम ३ हा चित्रपट त्या वर्षी हिट ठरला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी आधी दीपीकाला विचारण्यात आले होते, परंतु दुसर्‍याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बीझी असल्याने दीपीकाने नकार दिला. नंतर कटरिना कैफने ही भूमिका स्विकारली.


किक


२०१४ साली सलमान खानचा किक हा चित्रपट आला होता. त्यात एका गाण्यासाठी दीपीकाला विचारण्यात आले होते. परंतु दीपीका तेव्हा हॅप्पी न्यु इयर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती, तेव्हा रॉकस्टार फेम नर्गिस फाकरीने या गाण्यात काम केले होते.  

सुलतान

सुलतान चित्रपटातील अनुष्का शर्माच्या अभिनयायाची खूप प्रशंसा झाली होती. परंतु निर्मात्यांनी आधी दीपीका पदुकोणला या चित्रपटाबद्दल विचारले होते. परंतु दीपीकाने या चित्रपटाला नकार दिला आणि अनुष्का शर्माकडे ही भूमिका गेली. 


प्रेम रतन धन पायो

सुलतानच नाही तर २०१५ साली आलेल्या सूरज बडजात्या दिग्दर्शित, निर्मित प्रेम रतन धन पायो हा चित्रपटही दीपिका पदुकोणला ऑफर झाला होता. परंतु बीझी शेड्युल्डमुळे दीपीकाने या चित्रपटाला नकार दिला. नंतर सोनम कपूरकडे ही भूमिका आली. हा चित्रपटही हिट झाला होता आणि या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता. 

जब तक है जान

जब तक है जान यश चोपडा यांचा अखेरचा चित्रपट होता, या चित्रपटातील अकीरा या व्यक्तिरेखेसाठी दीपीकाला विचारण्यात आले होते. या चित्रपटात कटरिना कैफ आणि शाहरूख यांची प्रमुख भूमिका होती, नंतर दीपिकाची भूमिका अनुष्का शर्माकडे गेली


फास्ट अँड फ्युरियस- ७


हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार तयार असतात. परंतु दीपिका पदुकोणने फास्ट अँड फ्युरियसच्या सातव्या पार्टसाठी नकार दिला होता. तेव्हा दीपिका संजय लीला भन्साली यांच्या राम लीला चित्रपटात व्यग्र होती. त्यानंतर २०१७ साली आलेल्या xXx: रिटर्न ऑफ जेंडर केज  या चित्रपटातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी