मेट गालाच्या पार्टीमध्येही दीपिकाचा जलवा; पाहा फोटो

झगमगाट
Updated May 08, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर मेट गालाच्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय. त्यात दीपिका पदुकोन सगळ्यांची मनं जिंकून गेलीय. तिच्या स्टाईलची अनेकांनी प्रशंसा केली असून, तिचे आऊटफिट तिला बघतच राहवे, असे आहेत.

deepika padukone
मेट गालामध्ये दीपिका पदुकोण   |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: सध्या हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंत एकच चर्चा आहे ती, म्हणजे न्यूयॉर्कमधल्या मेट गालाची. सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर मेट गालाच्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय. त्यातही भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणून बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींनी यात सगळ्यांच लक्ष वेधलंय. त्यात प्रियंका चोप्रा ट्रोल झाली असली तरी, दीपिका पदुकोण मात्र सगळ्यांची मनं जिंकून गेलीय. तिच्या जबरदस्त स्टाईलची अनेकांनी प्रशंसा केली असून, तिचे आऊटफिट पहात राहवे, असे आहेत. अर्थात ते तिला चांगलेही दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या मेट गालामध्ये कुणी राज्य केलं तर ते दीपिकानच केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या मेट गालामध्ये दीपिका पदुकोण ६ मे रोजी पहिल्यांदा सहभागी झाली. त्याच दिवशी पिंक कलरचा स्टिपलेस गाऊन घालून आलेल्या दीपिकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या बार्बी टाइप अवतारात दीपिकाचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. तिचा गाऊन घालून हॉटेलच्या बाहेर येत गाडीत बसतानाचा एक व्हिडिओ इन्सटाग्रामवर शेअर झाला होता. त्याला भरभरून व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. जॅक पोजन आउटफिटमध्ये दीपिकाला केवळ बघत रहावे, असे वाटत होते.

प्रियंका ट्रोल तर, दीपिकाला लाईक्स

मेट गालानंतर दीपिका लगेचच आफ्टर पार्टीमध्ये दिसली. त्यातही तिनं आपल्या वेस्टर्न शृंगाराने चाहत्यांचं मन जिंकलं. त्यातही दीपिका जॅक पोजनच्याच डिझाइन केलेल्या विंटेज यलो मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. अॅक्सेसरीजमध्ये तिनं ब्लू इयररिंग्ज घातल्या होत्या आणि यलो मॅक्सीवरचा व्हाइट कोट तिला फारच उठून दिसत होता. या ड्रेसला साजेशा स्ट्रॅपी हिल्स तिनं घातल्या होत्या आणि सोबत व्हाइट मिनी टोट बॅग कॅरी केली होती. दीपिकानं या आऊटफिटचे फोटो आपल्या इन्सटा अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्याला तिच्या चाहत्यांचे भरभरून लाईक्स मिळत आहेत. या हटके आऊटफिटवर दीपिकाच्या रिलेटेड मेकअपने कळस चढवलाय. तिची हाय पोनी, न्यूड लिप्स आणि स्मोकी आइजने आऊटफिटला आणखीनच रंगत आणली. या पार्टीत दीपिका अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आणि यूट्यूबर लिलि सिंह यांच्यासोबत दिसली. दीपिकाने जैक पोजनचा जो पिंक गाऊन घातला होता. त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. थ्री डी प्रिंटेड पीस जोडून हा गाऊन तयार करण्यात आला होता. तिच्या या लूकचे कौतुक झाले होते. सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा ट्रोल झाली असताना दीपिकाला मात्र लाईक्स मिळत होत्या. पण, काहींना तिचा हा वेस्टर्न लूकही आवडला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मेट गालाच्या पार्टीमध्येही दीपिकाचा जलवा; पाहा फोटो Description: सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर मेट गालाच्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय. त्यात दीपिका पदुकोन सगळ्यांची मनं जिंकून गेलीय. तिच्या स्टाईलची अनेकांनी प्रशंसा केली असून, तिचे आऊटफिट तिला बघतच राहवे, असे आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स