Shah Rukh fought with Gauri बॉलीवूड स्टार शाहरुख खान काही दिवसांपूर्वी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत पोहोचला होता. या कार्यक्रमात शाहरुख खानने शानदार परफॉर्मन्स देत सर्वांची मने जिंकली होती. या कार्यक्रमात शाहरुखने आपल्या बॉलीवूड सहकलाकारांसोबत बराच वेळ घालवला. मात्र, त्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख पत्नी गौरी खानसोबत भांडताना दिसत आहे. किंग खानचा हा व्हिडिओ पाहून लोक चांगलेच संतापले आहेत. किंग खानने पत्नीसोबत असे जाहीर भांडण करायला नको होते, असे त्याचे चाहते बोलत आहेत. (drunk shahrukh khan fought with wife gauri khan while shes enjoying priyanka chopras performance )
अधिक वाचा : मुंबईकरांना आनंदवार्ता; 33690 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
या कार्यक्रमात बॉलीवूडचे अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये प्रियांका चोपडा हीचा देखील समावेश होता. देसी गर्ल प्रियंका चोपडाने देखील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये शानदार परफॉर्मस करत कार्यक्रमात रंग भरला होता. तिने डान्स फ्लोअरवर रणवीर सिंगसोबत काही स्टेप्स केले.
प्रियांका चोपडा रणवीर सिंगसोबत फ्लोअरवर डान्स करत असताना खाली गौरी खान तिला पाहत टाळ्या वाजवत होती. शाहरुखला गौरीची हीच गोष्ट आवडली नसल्याचे म्हंटले जात आहे. ज्यामुळे त्याने गौरी खानसोबत वाद घातला. शाहरुख खान आणि प्रियांका चोपडा यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाबद्दल आपल्या सर्वांना माहितच आहे!
अधिक वाचा : Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...;
शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील आदर्श जोडीपैकी एक आहे. त्यांना पाहून अनेक तरुण जोडप्यांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळे त्यांना असे भांडताना बघून लोकांना खूप त्रास होतो आहे. किंग खान आणि गौरी खान यांच्यात नेमका वाद कशामुळे झाला हा मोठा प्रश्न लोकांना पडला आहे.