Nushrat Bharucha Speaks About Sex Education । मुंबई : नुसरत भरूचाचा चित्रपट 'जनहित में जारी' १० जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका मेसेजसह कॉमेडी ड्रामा आहे. नुसरत चित्रपटात कंडोम विक्रेता बनली आहे. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर खूपच चर्चेत आला आहे. दरम्यान आता तिचे एक वक्तव्य देखील खूप चर्चेत आले आहे. एका मुलाखतीदरम्यान, तिने भाष्य केले की जेव्हा तिला कंडोमबद्दल पहिल्यांदा कळले आणि त्यावर तिची प्रतिक्रिया काय होती. नुसरतने सांगितले की, तिच्या पालकांनीही याबद्दल तिला सांगितले होते आणि ही परिस्थिती तिच्यासाठी सोपी नव्हती. नुसरतने म्हटले की तिच्या पालकांनी तिला याबाबत असे समजावले की ती स्वत:ला लकी मानते.
अधिक वाचा : बारावीचा निकाल जाहीर; चेक करा या लिंकवर
नुसरत भरुचा तिच्या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात ती कंडोम सेल्स गर्ल बनली आहे. चित्रपटात एका मेसेजसह कॉमेडी ड्रामा आहे. बॉलीवूड लाइफशी संवाद साधताना तिने म्हटले की, "मला वाटते की मी भाग्यवान आहे की आम्हाला शाळेतच जीवशास्त्र आणि लैंगिक शिक्षणाचे धडे शिकवले गेले. याबाबतची चर्चा शाळेत असतानाच व्हायची, जे अनेक शाळांमध्ये होत नाही. त्यामुळे शाळा ही पहिली जागा होती जिथे मला कंडोमबद्दल माहिती मिळाली."
नुसरतने सांगितले की, घरी देखील माझ्या आई-वडिलांनी माझ्याशी याबद्दल चर्चा केली होती. तेव्हा मला काहीच समजत नव्हते की ते काय बोलत आहेत. पण त्यांनी मला एका दिवसात सर्व काही सांगितले नाही. ते सांगत राहिले आणि एक दिवस हा मेसेज पक्का डोक्यात बसला. मग मला समजले की ते काय आहे आणि कशासाठी आहे. साहजिकच त्याबाबत अनेक प्रश्न मनात येत होते. ते स्पष्टपणे सांगू शकत नव्हते किंवा डेमो देखील दाखवू शकत नव्हते. पण मला शक्य तितके सामान्य पद्धतीने त्यांनी समजावून सांगितले.