मुंबई: Rahul Dravid Family Relation With Marathi Actress: एकेकाळी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लोकांच्या बरीच पसंतीस उतरली होती. या मालिकेतून एक अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली ती म्हणजे अदिती द्रविड (Aditi Dravid). या मालिकेतून अदितीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकेच्या माध्यमातून अदिती लोकांच्या मनात आणि घराघरात पोहोचली. पण आता अदितीनं सोशल मीडियावर (Social Media) नवा खुलासा केला आहे. यात अदितीनं टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड (Rahul Dravid) यासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
नुकतंच अदितीनं सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर ‘Ask Me Anything’ या सेशनद्वारे लोकांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका यूजरनं अदितीला राहुल द्रविडबद्दल एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर अदितीनं एकदम हटक्या स्टाईलनं दिलं आहे.
राहुल द्रविड आणि तुझ्यात खरंच काय नातं आहे का? की या फक्त अफवा आहेत, असा प्रश्न एका चाहत्यानं तिला विचारला. त्यावर उत्तर देताना अभिनेत्रीनं उत्तर दिलं की, हो हे खरं आहे. राहुल द्रविड हे माझे चुलत काका आहेत. हे उत्तर देताना अदितीनं राहुल द्रविड यांच्यासोबतचा एक लहानपणीचा फोटो देखील शेअर केला आहे.
अदितीच्या या उत्तराचं स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रश्नाच्या उत्तरानंतर अदितीची फारच चर्चा आहे.
याआधी अदितीनं राहुल द्रविड यांच्या बर्थडेनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली होती. आपण एकाच कुटुंबातील आहोत याचा मला अभिमान आहे, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
तसंच मला आपले आडनाव फार आवडते. त्यामुळे मी ते कधीही बदलणार नाही. खूप प्रेम आणि आदर, असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अदिती सध्या कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत आहे. याआधी तिनं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ईशा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत तुळसा या भूमिका साकारल्या आहेत.