OTT Platform शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांची 'फर्जी' ही वेबसीरिज भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज ठरली आहे. एका मीडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे शाहिद कपूरची ही पहिलीच वेब सिरीज आहे. 'फर्जी' 9 फेब्रुवारी रोजी Amazon Prime या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. फर्जीचे एकूण 8 भाग आहेत. एका रिपोर्टनुसार 'फर्जी' भारतात अनेक वेळा पाहिली गेलेली पहिली वेब सीरिज ठरल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'Farzi' has become the most watched web series in India
फर्जी 9 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. यापूर्वी, त्याची 10 फेब्रुवारी ही रिलीज डेट निश्चित करण्यात आली होती. पण अॅमेझॉनने एक दिवस आधी प्रेक्षकांसाठी ही सिरीज उपलब्ध करून दिली होती. 'फर्जी' रिलीज होऊन एका महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि आता ती भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरिज बनली आहे. ओरमॅक्स मीडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे की, या मालिकेला ३.७ कोटींहून अधिक दर्शक लाभले आहेत. आपल्या OTT पदार्पणाच्या या सिरीजला मिळालेल्या घवघवीत यशाने शाहिद कपूर खूप खूश आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपला आनंदही व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : BCCIच्या नव्या करारानुसार हे 4 खेळाडू ए प्लस कॅटेगरीत
फर्जीच्या या यशाबद्दल शाहिद कपूरने त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि वेबसिरिज संबंधित सर्वांचे आभार मानले आहेत. या सिरिजमध्ये शाहिद सोबत विजय सेतुपती, राशि खन्ना, केके मेनन, भुवन अरोरा, रेजिना कॅसॅंड्रा आणि अमोल पालेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे.
अधिक वाचा : कोरोनापासून वाचण्यासाठी चार T येतील कामात
या मालिकेची कथा सनी नामक एका आर्टिस्टची आहे. सनीचे आजोबा (अमोल पालेकर) क्रांती नावाची प्रिंटिंग प्रेस चालवत असतात, जी जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. या प्रेसला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी त्यात बनावट नोटा छापण्याची धाडसी कल्पना सनीच्या डोक्यात येते. सनी हा आर्टिस्ट असल्यामुळे त्याने डिझाइन केलेल्या बनावट नोटा अगदी मूळ नोटाच्या जवळपास जाणारी असते. त्यामुळे खरी नोट आणि बनावट नोट यात फरक करणे खूप कठीण होणार असते.
सनी या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे की, आपल्या आजोबांच्या प्रिंटिंग प्रेसला वाचवण्याच्या चक्करमध्ये तो जे काही करतो आहे, ते पुढे जाऊन त्याला मोठ्या खोल दरीत गाडणार आहे, आणि यातून बाहेर येणं अशक्य आहे! या सिरिजमध्ये भुवन अरोराने सनीच्या मित्राची भूमिका साकारली आहे, सनीच्या जगात फक्त दोघेच आहेत, ते म्हणजे त्याचे आजोबा आणि मित्र फिरोज. या आठ भागांच्या सिरिजमध्ये सनीचा एक वेगळाच दृष्टिकोण पाहायला मिळतो. तो या सर्व घटना एक आर्टिस्टच्या नजरेतून पाहत असतो, आणि त्याच चष्म्यातून तो स्वतःमधले सामर्थ्य शोधून काढतो. मात्र त्याचा हाच दृष्टिकोण त्याला खड्ड्यात टाकणार असते.
शाहिद कपूर हा बॉलिवूड विश्वातला प्रसिद्ध अभिनेता असून त्याने 'जब वी मेट', 'हैदर', 'कबीर सिंग' यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी च्या मोठ्या पडद्यावर तो शेवटचा 'जर्सी' चित्रपटामधून दिसला होता.
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर फर्जी पाहता येईल. याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. 8 सीजनच्या सुपर हीट सिरिजचा सीक्वल देखील बनवला जाणार असल्याची बातमी ऐकिवात आहे.