Femina Miss India 2023 Winner: दिल्लीची श्रेया पूजा ठरली उपविजेती, सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव

झगमगाट
Updated Apr 16, 2023 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Femina Miss India 2023 Winner: राजस्थानची नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 ची विजेती ठरली आहे. तर दिल्लीची श्रेया पुजा ही या स्पर्धेची पहिली उपविजेती आणि मणिपूरची थौना ओझुम स्ट्रेला लुवांग दुसरी उपविजेती ठरली.

Femina Miss India 2023 Shreya Pooja became first runner up
दिल्लीची श्रेया पूजा ठरली उपविजेती  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • राजस्थानची नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 ची विजेती ठरली
  • दिल्लीची श्रेया पुजा ही या स्पर्धेची पहिली उपविजेती.
  • मणिपूरची थौना ओझुम स्ट्रेला लुवांग दुसरी उपविजेती ठरली.

Femina Miss India 2023 Winner: राजस्थानची नंदिनी गुप्ता ही फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 ची विजेती ठरली आहे. तर दिल्लीची श्रेया पुजा ही या स्पर्धेची पहिली उपविजेती आणि मणिपूरची थौना ओझुम स्ट्रेला लुवांग दुसरी उपविजेती ठरली. नंदिनीच्या विजयानंतर यापूर्वीची मिस इंडिया सिनी शेट्टीने तिला विजेतेपदाचा मुकूट (क्राऊन) परिधान केला. 19 वर्षांची नंदिनी गुप्ता आता मिस वर्ल्डच्या पुढील सिझनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. (Femina Miss India 2023 Shreya Pooja became first runner up) 

फेमिना मिस इंडिया 2023 चे आयोजन यावेळी ईशान्येकडील मणिपूर राज्यात करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मुलींनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत नंदिनी विजेती बनली आहे. नंदिनी ही मुळची राजस्थानच्या कोटा शहरातील रहिवासी आहे. कोटाची ओळख इंजिनियरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी देशातील सर्वात मोठी कोचिंग सिटी म्हणून आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. नंदिनी उद्योगपती रतन टाटा यांना तिच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानते.

अधिक वाचा: Femina Miss India 2023 Winner: जाणून घ्या 19 वर्षीय मॉडेल नंदिनी गुप्ताचा मिस इंडिया प्रवास

मिस इंडिया संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा हे नंदिनीच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहेत. एका मुलाखतीत नंदिनी म्हणाली की, रतन टाटा सर्व काही मानवतेसाठी करतात आणि त्यातील बहुतांश दान धर्मादायतेसाठी करतात. यानंतरही ते कायम जमिनीवर असतात. रतन टाटांशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राही तिच्या कामामुळे आपल्याला प्रेरणा देते, असंही नंदिनी म्हणाली होती. 

अधिक वाचा: Actor Car Fire : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग

फेमिना मिस इंडिया 2023 मध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कार्तिक आर्यनने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करून फेमिना मिस इंडिया 2023 ची विजेती नंदिनीच अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी