Femina Miss India 2023 Winner: जाणून घ्या 19 वर्षीय मॉडेल नंदिनी गुप्ताचा मिस इंडिया प्रवास

झगमगाट
Updated Apr 16, 2023 | 11:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Femina Miss India 2023: देशासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. फेमिना मिस इंडिया 2023 ची घोषणा झाली आहे. राजस्थानच्या नंदिनी गुप्ताची मिस इंडिया 2023 ची विजेती म्हणून निवड झाली.

Femina Miss India 2023 Winner Nandini Gupta
Femina Miss India 2023 Winner: जाणून घ्या 19 वर्षीय मॉडेल नंदिनी गुप्ताचा मिस इंडिया प्रवास  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • देशासाठी अतिशय अभिमानाचा क्षण
  • फेमिना मिस इंडिया 2023 ची घोषणा झाली आहे.
  • राजस्थानच्या नंदिनी गुप्ताची मिस इंडिया 2023 ची विजेती म्हणून निवड

Femina Miss India 2023: देशासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. फेमिना मिस इंडिया 2023 ची घोषणा झाली आहे. 19 वर्षीय मॉडेल नंदिनी गुप्ताची मिस इंडिया 2023 ची विजेती म्हणून निवड झाली. 59व्या फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत नंदिनी गुप्ताला मिस इंडियाचा मुकुट देण्यात आला. मिस इंडिया 2022 सिनी शेट्टीने नंदिनीला मिस इंडिया 2023चा मुकुट घातला, जी मिस वर्ल्ड स्पर्धेच्या पुढील आवृत्तीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ( Femina Miss India 2023 Winner Nandini Gupta Miss India journey) 

दिल्लीच्या श्रेया पुंजा हिला प्रथम उपविजेतेपद आणि मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांगला द्वितीय उपविजेतेपद देण्यात आले आहे. मिस इंडिया 2023ग्रँड फिनाले मणिपूरमधील इंफाळ येथे पार पडली. यामध्ये अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि नेहा धुपिया सारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

अधिक वाचा: Actor Car Fire : सिनेमा आणि टीव्ही मालिकांतून चमकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारला आग

कोण आहे नंदिनी गुप्ता? 

नंदिनी गुप्ताचा जन्म राजस्थानमध्ये झाला असून ती 19 वर्षांची आहे. तिचे शालेय शिक्षण सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूल आणि लाला लजपत राय कॉलेजमधून झाले. नंदिनी गुप्ता सध्या मॉडेल आहे. तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. 

अधिक वाचा: Priyanka Chopra-Nick Jonas लंडनच्या रस्त्यावर झाले रोमँटिक, लिप लॉक सीनचे फोटो व्हायरल

लहानपणापासूनच नंदिनी गुप्ता अतिशय कुशाग्र होती. शाळेतील विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्येही ती भाग घेत असे. फेमिना मिस इंडिया 2023 मध्ये माजी विजेते सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मनसा वाराणसी, मनिका श्योकंद, मन्या सिंग, सुमन राव आणि शिवानी जाधव यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत देशभरातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत 29 राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमधून स्पर्धक आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी