अखेर महेश मांजरेकरांची माघार, 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' च्या प्रोमोमधले काढले ते 'सीन'

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा प्रोमो सोमवारी रिलिज झाला. त्यातील बोल्ड सीनमुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबद्दल महिला आयोग तसेच बाल अधिकार संरक्षण आयोगाकडेही तक्रार करण्यात आली. त्यानंतर मांजरेकरांनी माफी मागितली आहे.

Finally, Mahesh Manjrekar's withdrawal, from the promo of 'Nai Varanbhat Loncha Kon Nai Koncha', the 'scene'
अखेर महेश मांजरेकरांची माघार, 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' च्या प्रोमोमधले काढले ते 'सीन'  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा प्रोमो रिलिज
  • प्रोमोमध्ये महिला आणि मुलांबाबत आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने वाद
  • महिला आयोगाच्या तक्रारीनंतर ते सीन हटवले

मुंबई : दिवंगत लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित चित्रपट दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट शुक्रवार, १४ जानेवारीपासून प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये दाखवलेल्या काही बोल्ड सीनमुले हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याबद्दल महिला आयोग तसेच बाल अधिकार संरक्षण आयोगाकडेही तक्रार करण्यात आली. त्यानंतर ही आक्षेपार्ह दृश्ये केवळ प्रोमोच नव्हे तर चित्रपटातूनही काढून टाकण्यात आली असल्याची माहिती मांजरेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. (Finally, Mahesh Manjrekar's withdrawal, from the promo of 'Nai Varanbhat Loncha Kon Nai Koncha', the 'scene')

महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाचा प्रोमोमध्ये गिरणी कामगारांची मुले आणि त्यांच्या बायका यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आल्याची टीका सुरू झाली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी तक्रार ‘राष्ट्रीय महिला आयोगाने’ केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे नोंदवली. ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’कडेही या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची दखल घेत चित्रपटात दाखवलेल्या आशयाची तपासणी करण्यात यावी. तसेच पोक्सो कायद्यांतर्गत या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’ने लेखी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

यावर मांजरेकर यांनी निवेदन प्रसिध्द केले असून त्यात म्हटले आहे की,'या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकली आहे. तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे. ' आक्षेपार्ह दृष्ये ही केवळ प्रोमोमधूनच नाही तर चित्रपटामधून देखील वगळण्यात आल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी