Raju Shirvastav :गजोधर आणि या लग्नाच्या कॉमेडीमुळे घरा घरात पोहोचले राजू श्रीवस्तव, पहा त्यांचे धमाल परफॉर्मन्स

Raju Shirvastav Comedy : राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीचे अनेक शो केले होते. त्यांनी चित्रपटातही काम केले होते. परंतु स्टार वनच्या द ग्रेट लाफ्टर चॅलेंजमुळे त्यांन ओळख मिळाली. त्यांच्या गजोधर या कॅरेक्टर तसेच लग्न प्रसंगातील एका कॉमेडीमुळे ते अफाट लोकप्रिय झाले होते.

raju shrivastav
राजू श्रीवास्तव  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीचे अनेक शो केले होते. त्यांनी चित्रपटातही काम केले होते.
  • परंतु स्टार वनच्या द ग्रेट लाफ्टर चॅलेंजमुळे त्यांन ओळख मिळाली.
  • त्यांच्या गजोधर या कॅरेक्टर तसेच लग्न प्रसंगातील एका कॉमेडीमुळे ते अफाट लोकप्रिय झाले होते.

Raju Shirvastav Comedy : मुंबई : नुकतंच स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. ते ५८ वर्षाचे होते. १० ऑगस्टला दिल्लीत जिममध्ये व्यायाम करताना त्यांना  कार्डियेक अरेस्टचा झटका आला. त्यानंतर श्रीवास्तव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूवर सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडीचे अनेक शो केले होते. त्यांनी चित्रपटातही काम केले होते. परंतु स्टार वनच्या द ग्रेट लाफ्टर चॅलेंजमुळे त्यांन ओळख मिळाली. त्यांच्या गजोधर या कॅरेक्टर तसेच लग्न प्रसंगातील एका कॉमेडीमुळे ते अफाट लोकप्रिय झाले होते. (gajodhar bhaiiyaa and behen ki shadi popular stand up comedy of raju shirvastav)

अधिक वाचा :  Chhello Show Oscars 2023 : छेलो शो या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी भारताची ऑफिशियल एन्ट्री, कश्मीर फाईल्स आणि RRR ला झटका


गजोधर भैय्या

राजू श्रीवास्तव यांनी गजोधर भय्या नावाचे एक कॅरेक्टर तयार केले होते. गजोधर भय्या हा अमिताभ बच्चनचा फॅन असतो आणि तो ही चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी मुंबईत दाखल होतो. तो अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन देतो परंतु चित्रपट न आवडल्याने तो चित्रपटात काम करत नाही. गजोधर भय्या परत आपल्या गावी येतो आणि गावकर्‍यांना मुंबईच्या गमती जमती सांगतो. राजू श्रीवास्तव आपल्या अवधी आणि भोजपूरी भाषेच्या उच्चारातून कॉमेडी करायचे. 

 

अधिक वाचा :  Sonam Kapoor Son: सोनम कपूरच्या बाळाचं बारसं, फॅमिली फोटो शेअर करत सांगितला मुलाच्या नावाचा खास अर्थ


लग्नाची कॉमेडी


मुंबईत स्थायिक झालेल्या एका उत्तर भारतीय कुटुंबात लग्न असतं. तेव्हा या लग्नाचे वर्णन करणारे राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडी शो केला होता. या लग्नात कसे वेगवेगळे लोक वागत असतात, मुलीची आई, मुलीचा भाऊ आणि मुलीचा बाप लग्नात कसे वागतात याचे वर्णन करताना प्रेक्षक पोट धरून हसत होते. त्यांचा हा परफॉर्मन्स चांगलाच गाजला होता. 

 

चित्रपटातही काम 

राजू श्रीवास्तव यांनी अनिल कपूर आणि माधूरी दिक्षित यांच्या तेजाब चित्रपटातून पदार्पण केले होते, श्रीवास्तव यांनी शाहरुख खानच्या बाझीगर चित्रपटातही भूमिका बजावली होती. तसेच अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांची डुप्लिकेटची भूमिका निभावली होती. 

अधिक वाचा : Brahmastra Box Office Collection: 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर गडगडला ब्रह्मास्त्र; जाणून घ्या किती केलं कलेक्शन

ये करलो पेहले

राजू श्रीवास्तव यांच्या कॉमेडीमध्ये गजोधर एक वाक्य बोलतो हा ये करलो पेहले. हे वाक्य नेटकर्‍यांमध्ये तुफान हिट झाले असून नेटकर्‍यांनी अनेक वेळेला यावर मीम बनवले होते. गजोधर भैय्यावरील डायलॉगवर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी