Swwapnil Joshi: स्वप्निल जोशीच्या घरी गणरायाचे थाटात आगमन, खास आहे ही गणरायाची पारंपरिक मूर्ती

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 03, 2022 | 10:57 IST

Swwapnil Joshi Shared Ganpati Video:मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi cinema) चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swwapnil Joshi) घरी ही बाप्पांचं आगमन झालं आहे.

Swwapnil Joshi Ganeshotsav 2022
स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन, 
थोडं पण कामाचं
  • मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi cinema) चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swwapnil Joshi) घरी ही बाप्पांचं आगमन झालं आहे.
  • स्वप्निलनं कोरोना काळात दोन वर्ष साधेपणानं गणपती घरी आणला होता.
  • बाप्पाला घरी आणताच स्वप्नीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मुंबई: Swwapnil Joshi Ganeshotsav 2022: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganesh festival) धामधूम सुरू आहे. सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.  मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi cinema)  चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swwapnil Joshi)  घरी ही बाप्पांचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची स्वप्नीलच्या घरी गणेशोत्सव साजरा होत आहे.  बाप्पाला घरी आणताच स्वप्नीलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्नीलच्या घरी दरवर्षी गणेशाची प्रतिष्ठापना होते. (Ganesh chaturthi 2022 actor Swwapnil Joshi bappa celebrity ganpati aarti video)

स्वप्निलनं कोरोना काळात दोन वर्ष साधेपणानं गणपती घरी आणला होता. पण यंदा  निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह अधिक आहे. 

स्वप्नील जोशीने पारंपरिक मूर्तीची घरी स्थापना केली आहे. स्वप्नीलच्या घरच्या बाप्पाची मूर्ती पंचधातूची आहे.  बाप्पाच्या आगमनावेळी स्वप्नीलने चांगले आरोग्य लाभो, सुख समाधान घरी नांदो ही प्रार्थना केली आहे. स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाच्या आगमनावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

अधिक वाचा- वजन वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, महिन्याभरात जाणवेल फरक 

पंचधातूची मूर्ती विराजमान 

स्वप्नीलच्या घरी गणपतीची ही एकच मूर्ती दरवर्षी विराजमान होते.  स्वप्नीलनं ही गणेशमूर्ती घडवून घेतली आहे.  पर्यावरणाचा विचार करून ही मूर्ती त्याने बनवून घेतली आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाची पंचधातूची मूर्ती विराजमान होते. बाप्पाची एकच मूर्ती आहे, जी दरवेळी विराजमान होत असल्याचं स्वप्नीलनं सांगितलं.

शेअर केला एक व्हिडिओ 

स्वप्निलनं एक व्हिडिओ ट्वीट केलाय. त्यात त्याची मुलगी मायरा आणि राघव बाप्पासमोर उभे आहेत. या व्हिडिओमध्ये स्वप्नील विचारतोय, बाप्पाला काय देणार तुम्ही? तेव्हा मायरा म्हणते, मी लाडू, पेढा देणार आणि जिलेबीही देणार. नंतर छोटा राघव पाय उंचावून बाप्पाला सांगतो, मी पुरणपोळी देणार. 

स्वप्नीलनं आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वप्नीलसह त्याचं कुटुंब आरती करताना दिसत आहे. 


स्वप्नीलचं वर्कफ्रंट 

स्वप्निल जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. स्वप्नीलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास त्याची नवी मालिका ‘तू तेव्हा तशी’ काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसत आहे. तसंच चला हवा येऊ द्या कार्यक्रमात स्वप्नील परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी