Harnaaz Kaur Sandhu Miss Universe 2021 Winner: मिस चंडीगढ ते मिस युनिव्हर्स, जाणून घ्या हरनाज कौरचा प्रवास

इस्राईलमधील ७० व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने बाजी मारली आहे. हरनाजे २०२१ च्या मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर करून घेतला आहे. २१ वर्षाची असलेली हरनाज विविध देश आणि क्षेत्रातील ७९ प्रतिस्पर्ध्यांना हरवून मिस युनिव्हर्स झाली आहे. Harnaaz Sandhu Miss Universe 2021 from india biography life facts family education qualification

Harnaaz
हरनाज   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • इस्राईलमधील ७० व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने बाजी मारली आहे.
  • हरनाज विविध देश आणि क्षेत्रातील ७९ प्रतिस्पर्ध्यांना हरवून मिस युनिव्हर्स झाली
  • २१ वर्षाच्या हरनाजचा मिस युनिव्हर्स पर्यंतचा प्रवास सरळ सोपा नव्हता.

Harnaaz Kaur Sandhu Miss Universe 2021 Winner:  मुंबई :  इस्राईल (israel) मधील ७० व्या मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Kaur Sandhu) बाजी मारली आहे. हरनाजे २०२१ च्या मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर करून घेतला आहे. २१ वर्षाची असलेली हरनाज विविध देश आणि क्षेत्रातील ७९ प्रतिस्पर्ध्यांना हरवून मिस युनिव्हर्स झाली आहे. यापूर्वी २१ वर्षापूर्वी २००० साली अभिनेत्री लारा दत्ता (Actress Lara Dutta) ने हा मुकुट मिळवला होता. (Harnaaz Sandhu Miss Universe 2021 from india biography life facts family education qualification)

मिस युनिव्हरस संस्थेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हरनाज संधू मिस युनिव्हर्स झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून तिला मिस युनिव्हर्सचा मुकुट घालण्यात आला आहे. तसेच ही आहे नवी मिस युनिव्हर्स इंडिया असे कॅप्शनही देण्यात आले आहे.  

मिस चंडीगड ते मिस युनिव्हर्स

२१ वर्षाच्या हरनाजचा मिस युनिव्हर्स पर्यंतचा प्रवास सरळ सोपा नव्हता. हरनाजने मॉडेल म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. हरनाजने नंतर काही पंजाबी चित्रपटताही काम केले आहे. त्यात ‘यारा दिया पू बरन’ आणि ‘बाई जी कुट्टंगे’ या चित्रपटांचा समावेश आहे. हरनाजनने अनेक फॅशन प्रोग्रॅम आणि ब्युटी कॉटेंस्ट स्पर्धेत भाग घेतला होता. २०१७ साली हरनाज मिस चंडीगढ झाली होती. त्याच वर्षी तिने मिस चंडीगढ टाईम्सफ्रेशने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर हरनाजने मिस फेमिन स्पर्धेतही भाग घेतला होता.

लोकप्रशासन विषयात शिक्षण

हरनाजने चंडीगढ येथील शिवालिक पब्लिक स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एका कन्या महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले. हरनाज सध्या लोकप्रशासन विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेत आहे. आपल्या आई वडिलांसह आपल्या देशाचे नाव मोठं करायचे आहे अशी हरनाजची इच्छा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी