मुंबई: कॉमेडी क्वीन भारती सिंग (Comedy Queen Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) हे कपल प्रेक्षकांच्या आवडत्या (Favorite couple) कपलपैकी एक आहे. बऱ्याच लोकांचं हे फेवरेट कपल आहे. प्रेक्षकांना त्यांच्यातला बॉन्डचं नाही तर या कपल्समधले जोक्सही आवडतात. एप्रिल महिन्यात या कपलच्या घरी पाळणा हलला. भारतीनं एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी या कपलनं मुलाच्या नाव जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी आपल्या बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र आता भारती आणि हर्षच्या बाळाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या कपलनं चाहत्यांना भेट देत आपल्या मुलाचा चेहरा दाखवला आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारती सिंगची Excitement
व्हिडिओच्या सुरूवातीला भारती सिंग म्हणते, 'हर्ष आंघोळीला गेला आहे... यार आज तुम्ही गोलाला बघाल. मला खूप मेसेज आले होते, खूप टोमणेही ऐकायला मिळाले होते, पण आज तुला गोला बघायला मिळणार आहे. खरंतर वाढदिवसाच्या व्लॉगवर दाखवायला हवे होते, मात्र आम्ही बाहेर गेलो तर ते चांगले होऊ शकणार नाही. हर्ष आणि भारतीचा गोला आहे, त्यांनी अशी छोटीशी चादर काढून गोलाचा चेहरा दाखवला. मी खूप एक्साइटिड आहे, तो आता झोपला आहे, मला तयारी करू द्या. कारण पहिल्यांदाच दाखवायचं असेल तर हिरोसारखं दिसायला हवा ना?
भारतीनं दाखवली मुलाची खोली
यानंतर लक्ष्यची संपूर्ण खोली कशी सजवली जात आहे हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये भारती सिंग मुलगा गोले (लक्ष्य) ची खोली देखील दाखवते. यात भारती दाखवताना दिसत आहे की ती तिच्या मुलाचा डायपर कुठे बदलते, त्याचा पाळणा कुठे आहे आणि बाकीची खोली सुद्धा बघायला मिळते.
अधिक वाचा- मुंबईत पावसाचं थैमान,BMC नं केलं महत्त्वाचं Tweet; जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स
पुढे भारती गंमतीनं म्हणते की, कधीकधी मलाही असं वाटतं की गोलेच्या बेडवर झोपून जावं. त्यानंतर भारती मुलाची खेळणी दाखवतेय आणि सांगते की जेव्हा जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याला ते समोर हवे असतात.
पुढे व्हिडिओत दिसतेय की भारती मुलाला तयार करतेय आणि बघा आज आम्ही तुम्हाला आमचा लाडका मुलगा दाखवत आहोत, पण त्यानं शी शी केली आहे, पॉटी केली आहे. कपडे घालूनही. एकदम वडिलांवर गेला आहे. भारती एवढं बोलून शांत बसत नाही, पुढे ती गंमतीने म्हणते, आमच्या घरी जन्म झाला तर डोक्यावर चढणार का?' यानंतर हर्ष व्हिडिओमध्ये येतो आणि नंतर हसतो आणि विनोद करतो.
भारती आणि हर्षच्या मुलाची पहिली झलक
व्हिडिओच्या शेवटी हर्ष आणि भारती अतिशय गोंडस पद्धतीने व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलाचा म्हणजेच लक्ष्यचा चेहरा दाखवतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, हर्ष आणि भारती 3 डिसेंबर 2017 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. यानंतर भारती सिंगनं 3 एप्रिल 2022 रोजी चाहत्यांना खुशखबर दिली. भारती आणि हर्षचा मुलगा लक्ष्यला प्रेमानं गोला म्हणतात आणि चाहते गोलाची पहिली झलक पाहण्यासाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते जी आता झलक समोर आली आहे.