HOLI Songs 2023 : मुंबई : होळी सणाची उत्सुकता सगळ्यांना असते. हा सण लहांनापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो.सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. आपल्याकडे होळीची अनेक गाणीही (songs)प्रसिद्ध (popular) आहेत. बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये (moive) होळी खेळताना दाखविण्यात आले आहे. अनेक चित्रपटात कलाकार होळी साजरी करताना आपण पाहिलं आहे. मात्र चित्रपटांमध्ये होळीचा ट्रेंड कसा सुरू झाला आणि तो कोणी सुरू केला? आणि कोण-कोणती गाणी होळीसाठी (holi) लोकप्रिय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.. (HOLI Songs 2023 : Without this Bollywood songs Holi will remain meaningless; Listen Super Duper Hindi Song)
अधिक वाचा : लग्नानंतर तुमचे हे बदलले का? मग हे असेल कारण
बॉलिवूडमध्ये ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाच्या काळापासून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 'औरत' हा चित्रपट स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1940 साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये होळीचा सण पहिल्यांदाच दाखवण्यात आला होता. हा चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. 1957 मध्ये मेहबूब खान यांनी 'औरत' चित्रपटाचा रिमेक बनवला, ज्याचे नाव मदर इंडिया होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला अजुनही हा चित्रपट लोकप्रिय आहे.
अधिक वाचा :डिजिटल मार्केटिंगमध्ये असं बनवा आपलं करिअर
त्यानंतर अनेक चित्रपटात होळीचा सण दाखवण्यात आला आहे. त्यातील बरीच चित्रपट ही हिटदेखील झाले आहेत. होळीवर आधारित अनेक गाणी तयार करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी ही गाणी आज आपल्याला ऐकायला मिळतील. चला तर पाहुया अशीच काही होळी आणि रंगपंचमीची गाणी. ज्यावर नाचल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होऊ शकत नाही. जुन्या काळातील अशी अनेक गाणी आहेत जी लोकांना प्रत्येक होळीला ऐकायला आवडतात.
बॉलिवूडमधील अतिशय हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'ये जवानी है दिवानी.' या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील 'बलम पिचकारी...' हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ चित्रपटातील ‘आज ना छोडेंगे… हम तेरी चोली, खेलेंगे हम होली’ हे गाणं खूप सुपरहिट असून आजही होळी साजरी करताना प्रत्येक जण आवर्जुन हे गाणं लावतात. या गाण्याची आजही तितकीच क्रेझ पाहायला मिळते.
अधिक वाचा : आबा! हाताला नेमकं कधी हळद लावावी?
1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘होली के दिन दिल खिल जाते है…’ हे गाणं सर्वात जास्त लोकप्रिय गाणं आहेत. ज्या गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अपूर्ण आहे त्या गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. हे गाणं ऐकून सर्वजण होळीच्या मस्तीत तल्लीन होतात.
1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे…’ हे गाणं जरा वेगळंच आहे. या गाण्यात होळी सेलिब्रेशन दरम्यानची मजा मस्ती खूपच सुंदरपद्धतीने दाखवण्यात आली आहे. अमिताभ बच्चन-रेखा, जया-संजीव कुमार यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं प्रत्येक ठिकाणी होळी सेलिब्रेशन दरम्यान लावलेच जाते.
अधिक वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?
1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’चित्रपटातील ‘अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना’हे गाणं कोणाला आठवत नाही. या चित्रपटातील शाहरुखची नकारात्मक भूमिका आजही लक्षात आहे. हे गाणं सुद्धा होळी सेलिब्रेशनला लावलेच जाते.
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेल्या ‘होली खेले रघुवीरा..’ या गाण्यानेही लोकांची मने जिंकली होती.
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वक्त –द रेस अगेन्स्ट टाइम’या चित्रपटातील अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित केलेल्या ‘डू मी ए फेवर लेट्स प्ले होली…’ हे गाणं देखील खूप सुपरहिट ठरले आहे. गाण्याला काहीसा मॉर्डन टच होता पण तरुणांना ते खूप आवडले.
विशाल ददलानी आणि बेनी दयाल यांनी गायलेले आणि संगीतकार विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वॉर’चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यावर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणं सुद्धा होळी सेलिब्रेशनदरम्यान सर्वांना नाचायला भाग पाडते.
वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाचे शीर्षक गीत ‘बद्री की दुल्हनिया’ हे गाणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडते. होळीचे वातावरण अधिक रंगतदार करण्यासाठी हे गाणे अगदी तंतोतंत बसते.
रामलीला चित्रपटातील हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. अनेक ठिकाणी होळीच्या निमित्तानं हे गाणं वाजवलं जातं.
मोहबत्तें या चित्रपटातील सोनी अखियोंवाली हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यामुळं या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट येतो. कधीनव्हे ते पहिल्यांदाच गुरुकूलमध्ये होळीचा सण साजरा केला जातो.