Super 30 Movie Review: हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ला जबरदस्त प्रतिसाद; हृतिकच्या भूमिकेचं कौतुक

झगमगाट
Updated Jul 12, 2019 | 17:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Super 30 Movie Review: हृतिक रोशननं आजवर आपला लूक बदलणारा किंवा वेगळी भाषा असणार एकही सिनेमा केला नव्हता. सुपर ३०मध्ये मात्र, हृतिकनं बिहारी भाषेचा लहेजा अतिशय उत्तमपणे पकडला आहे. त्याच्या भूमिकेचं कौतुक होतय.

hrithik roshan
हृतिक रोशनचा सुपर ३० प्रेक्षकांना भावला   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • हृतिक रोशनचा सूपर ३० प्रेक्षकांना भावला
  • बिहारच्या आनंद कुमार यांची कहाणी पडद्यावर
  • विकास बहलचं उत्तम दिग्दर्शन; हृतिक पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत

Super 30 Movie Review : गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमामध्ये खूप मोठे बदल झाले. कधी न ऐकलेल्या किंवा पुस्तकांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये वाचलेल्या कथा सिनेमांच्या माध्यमातून पडद्यावर आहेत. कधी न पाहिलेल्या समाजाचं चित्रण यानिमित्तानं पडद्यावर पहायला मिळत आहे. असाच एक सिनेमा जो, आजच्या तरुणांचा उत्साह वाढवणारा सिनेमा पडद्यावर उतरला आहे. बिहारमधील सुपर थर्टी क्लासेसचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर बेतलेला 'सुपर ३०' रिलीज झाला असून, त्यात आनंदकुमार यांची भूमिका करणाऱ्या हृतिक रोशनच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. आनंद कुमार यांचे वडील पोस्टात काम करत होते. घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचं शिक्षण हिंदी मीडियममध्ये झालं. गणितामध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांनी स्वतः काही गणिताचे फॉर्म्युले तयार केले आणि अनेक तरुणांना ते शिकवलेही. त्यांच्या कोचिंग क्लासेसमधील अनेक तरुणांना आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला असून, त्यांच्या करिअरला उभारी मिळाली आहे. सुपर ३० सिनेमात हृतिक रोशनने आनंद कुमार यांची भूमिका हुबेहूब केल्याचं बोललं जात आहे.

 

हृतिकचा बिहारी अंदाज पाहण्यासारखा

आनंद कुमार यांना रामानुजम अवॉर्ड आणि अब्दुल कलाम आझाद शिक्षण पुरस्कार मिळाला होता. हा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक विकास बहलने अतिशय रंजक पद्धतीने आनंद कुमार यांचे कॅरेक्टर पडद्यावर उतरवले आहेत. त्यासाठी अर्थात हृतिक रोशननेही प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसत आहे. हृतिकने आजवर त्याचा लूक बदलणारी भूमिका पहिल्यांदाच केली आहे. आनंद कुमार बिहारचे असल्यामुळे सिनेमात भाषा पूर्णपणे बिहारची आहे. हृतिकनं आजवर अशी भाषा असणारा एकही सिनेमा केला नव्हता. बिहारी भाषेचा लहेजा अतिशय उत्तमपणे पकडत हृतिकने आनंद कुमार पडद्यावर रंगवला आहे. हृतिकचा हा बिहारी अंदाज निश्चित पाहण्यासारखा आहे. आनंद कुमारच्या प्रेयसीचं कॅरेक्टर मृणाला ठाकूरनं रंगवलंय. तिच्या वाट्याला खूप कमी सीन्स आले असले तरी, ती लक्षात राहते.

 

 

 

डायलॉगवर टाळ्या

भूमिका कितीही छोटी असली तरी, ती लक्षात राहील अशा पद्धतीने साकारणाऱ्या बॉलिवूडमधील मोजक्या कलाकारांमध्ये पंकज त्रिपाठी यांचा समावेश होता. त्रिपाठी यांनी या सिनेमात भ्रष्ट मंत्र्याची भूमिका केली आहे. सिनेमातील काही डायलॉग सध्या चर्चेत आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वो बनेगा जो हकदार होगा, हा डायलॉग सिनेमा थिएटरमधून बाहेर पडताना लक्षात राहतो. थिएटरमध्ये त्या डायलॉगवर टाळ्या ऐकायला मिळतात. सिनेमाचा पहिला हाफ अतिशय बॅलन्स आहे तर, सेकंड हाफमध्ये मेलोड्रामा पहायला मिळतो. त्यामुळं सिनेमा थोडा ताणला गेल्याचं वाटतं. गरीब मुलांचं आयआयटीयन बनण्याचं स्वप्न विकास बहलनं अतिशय उत्तमपणे पडद्यावर उतरवलं आहे. सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Super 30 Movie Review: हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ला जबरदस्त प्रतिसाद; हृतिकच्या भूमिकेचं कौतुक Description: Super 30 Movie Review: हृतिक रोशननं आजवर आपला लूक बदलणारा किंवा वेगळी भाषा असणार एकही सिनेमा केला नव्हता. सुपर ३०मध्ये मात्र, हृतिकनं बिहारी भाषेचा लहेजा अतिशय उत्तमपणे पकडला आहे. त्याच्या भूमिकेचं कौतुक होतय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola