Shahrukh Khan Movie : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुखचा लहान भाऊ रोहन झाला मोठा; फोटो पाहून चाहते म्हणाले...

झगमगाट
Updated Jan 22, 2022 | 15:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kabhi Khushi Kabhie Gham Movie | टीव्ही इंडस्ट्री असो की मग बॉलीवूड इंडस्ट्री मोठ्या कलाकारांसोबत तरुण आणि लहानगे कलाकारही आपल्या दमदार अभिनयाने आणि गोंडस शैलीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. चित्रपट किंवा व्यक्तिरेखा कितीही जुनी असली तरी पण कलाकार हा नेहमीच लोकांच्या मनावर त्याच्याच पध्दतीने छबी निर्माण करतो.

In Shahrukh Khan's film Kabhi Khushi Kabhi Gham Shah Rukh's younger brother Rohan grew up
'कभी खुशी कभी गम' मधील शाहरूखचा लहान भाऊ झाला मोठा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या लहान भावाच्या भूमिकेत दिसणारा लाडू उर्फ ​​रोहनने सोशल मीडियावर फोटो शेयर केला आहे.
  • कविश कभी खुशी कभी गम या चित्रपटानंतर काही वर्षांपर्यंत इंडस्ट्रीतून गायब झाला होता.
  • त्याने रितेश देशमुखच्या 'बँक चोर' चित्रपटात देखील काम केले आहे.

Kabhi Khushi Kabhie Gham Movie | नवी दिल्ली : टीव्ही इंडस्ट्री (TV Industry) असो की मग बॉलीवूड इंडस्ट्री (Bollywood Industry) मोठ्या कलाकारांसोबत तरुण आणि लहानगे कलाकारही आपल्या दमदार अभिनयाने आणि गोंडस शैलीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. चित्रपट किंवा व्यक्तिरेखा कितीही जुनी असली तरी पण कलाकार हा नेहमीच लोकांच्या मनावर त्याच्याच पध्दतीने छबी निर्माण करतो. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील सुप्रसिध्द चित्रपट 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham Movie) या चित्रपटातही तरुण कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ते आजतागायत ताजेतवाणे आहे. अगदी त्याच पध्दतीची अभिनय शैली म्हणजे रोहनची अभिनय शैली. या लहान रोहनची व्यक्तिरेखा कविश मुझुमदारने साकारली होती याची सर्वांनाच कल्पना आहे. (In Shahrukh Khan's film Kabhi Khushi Kabhi Gham Shah Rukh's younger brother Rohan grew up). 

अधिक वाचा : फक्त एक प्रीमियम भरा आणि दरमहा १२,००० रुपये मिळवा, पाहा कसे

मोठा झाला आहे शाहरुखचा लहान भाऊ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kavish Majmudar (@skavi87)

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटामध्ये शाहरुख खानच्या लहान भावाच्या भूमिकेत दिसणारा लाडू उर्फ ​​रोहन आता मोठा झाला आहे. नुकतेच रोहन म्हणजेच ​​कविशचे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एका सोशल मीडियावरील युजर्सने कमेंट करून विचारले की हा तोच गोलू-मोलू लाडू आहे. तर दुसरा युजर म्हणाला की तू किती बदलला आहेस. अशा काही भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. 

वरुण धवनसोबत केले आहे काम 

लक्षणीय बाब म्हणजे कविश कभी खुशी कभी गम या चित्रपटानंतर काही वर्षांपर्यंत इंडस्ट्रीतून गायब झाला होता. त्यानंतर तो वरूण धवनच्या 'मै तेरा हिरो' या चित्रपटात दिसला होता. यासोबतच त्याने रितेश देशमुखच्या 'बँक चोर' चित्रपटात देखील काम केले आहे. याशिवाय तो इमरान खानच्या लक या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिसला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी