Sayali Kamble Engaged : इंडियन आयडल फेम सायली कांबळेचा झाला साखरपुडा, रोमँटिक अंदाजात प्रियकराने घातली अंगठी

Sayali Kamble Engaged इंडियन आयडल फेम सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केली असून तिने इन्स्टाग्रामवर या क्षणाचे खास फोटो शेअर केले आहेत. 

sayali kamble
सायली कांबळे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • इंडियन आयडल फेम सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
  • सायलीचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा झाला
  • इन्स्टाग्रामवर या क्षणाचे खास फोटो शेअर केले आहेत

Sayali Kamble Engaged : मुंबई : इंडियन आयडल फेम सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सायलीचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा झाला असून तिने इन्स्टाग्रामवर या क्षणाचे खास फोटो शेअर केले आहेत. (indian idol 12 fame sayli kamble get engaged to boyfriend dhawal share photos on instagram) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Dhawal (@dhawal261192)


सायलीचा प्रियकर धवलने खास रोमँटिक अंदाजात तिच्या बोटात अंगठी घातली आहे. सायलीने हे फोटो इन्स्टावरू शेअर केले असून चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत . सायलीने या फोटोंसोबत एक भावनिक संदेशही दिला आहे. 

साखरपुड्याच्या या कार्यक्रमात दोघेही खुष दिसत आहे. दोघांनी एकत्र डान्स केला असून त्याचाही व्हिडीओ सायलीने शेअर केल आहे. सायलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात धवलने गुडघ्यावर बसून  सायलीला अंगठी घातली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by IamGujarat (@iamgujarat)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by @indianidol_12_fanpage

सायलीला शुभेच्छा देण्यासाठी इंडियन आयडलचे १२ चे कंटेस्टटही पोहोचले होते. निहाल, अनुष्का, नचिकेत, अंजली यांनी सायली आणि धवलला शुभेच्छा दिल्या आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी