जिममध्ये घाम गाळतायेत इशा आणि आकाश अंबानी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Isha Ambani and Isha Ambani in Gym: इशा अंबानी आणि आकाश अंबानी यांचा जिममधील एक फोटो नुकताच समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

isha and akash ambani sweating in gym photo viral on social media
जिममध्ये घाम गाळतायेत इशा आणि आकाश अंबानी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: देशातील सर्वात सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात. आता एकदा पुन्हा एकदा मुकेश अंबानीच्या मुलांचे काही खास फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये आकाश अंबानी आणि इशा अंबानी पाहायला मिळत आहेत.

अंबानी कुटुंबाच्या फॅन पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आकाश आणि इशा हे जिममध्ये असल्याचं दिसून येत आहे. इशा ग्रे कलरचं टी-शर्ट, पॅंट्स आणि ब्लू स्पोर्ट्स शूज अशा लूकमध्ये पाहायला मिळते आहे. तर आकाश अंबानी व्हाइट टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसतो आहे. त्याबरोबर त्याने व्हाइट स्पोर्ट्स शूज देखील घातले आहेत. दोघांचे हे फोटो त्याच्या चाहत्यांना खूपच आवडले असून आता ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

 

दरम्यान, याआधी देखील आकाशचे जिममधील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. मागील वर्षी आकाशने श्लोका मेहतासोबत लग्न केलं होतं. त्याच्या बरोबर एक महिन्यानंतर तो आपल्या पत्नीबरोबर जिममध्ये दिसून आला होता. त्यांचे हे फोटो सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर कुनाल गिर याने शेअर केले होते. 

आकाश अंबानी आणि इशा अंबानी हे जुळे भाऊ-बहीण आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या यांच्या लग्नाच्या ७ वर्षानंतर दोघांचा जन्म झाला होता. व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इशाने सांगितलं होतं की, तिचा जन्म आईव्हीएफच्या माध्यमातून झाला होता. यासोबत इशाने यावळी असंही सांगितलं होतं की, तिच्या लग्नासाठी आकाशने स्वत:चं लग्न पुढे ढकललं होतं. 

 

 

इशाने १२ डिसेंबर २०१८ला आनंद पीरामलशी लग्न केलं होतं. तर आकाश ९ मार्च २०१९ रोजी श्लोका मेहतासह लग्नाच्या बेडीत अडकला होता. अंबानी कुटुंबीयांमधील ही दोन्ही लग्न प्रचंड चर्चेत होती. ज्यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांसह देशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी