इटलीच्या रस्त्यांवर हिना खानने सगळ्यांसमोर केले बॉयफ्रेंडला किस

झगमगाट
Updated May 22, 2019 | 16:18 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

हिना खान नुकती ७२व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. यानंतर ती इटलीच्या मिलान शहरात आपल्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे. तिथे तेथील फोटोज आणि व्हिडिओजही शेअर केले आहेत.

hina khan
हिना खान 

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नुकतीच फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हेरामधील ७२व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. हिना येथे आपला आगामी सिनेमा 'लाईन्स'साठी आली होती. कान्स फेस्टिव्हलमध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवल्यानंतर ती आपला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालोसोबत इटलीच्या मिलान शहरात एन्जॉय करते आहे. 

हिना खानने आपल्या इन्स्टाग्रामवर सुट्टीचे काही फोटोज आणि व्हिडिओज  शेअर केले आहेत. हिनाने जे व्हिडिओज शेअर केले आहेत त्यात ती खूपच खुश दिसत आहे. हिना आपल्या बॉयफ्रेंडपती प्रेम व्यक्त करत असल्याचे फोटोतून दिसत आहे. व्हिडिओत हिना आपला बॉयफ्रेंड रॉकीला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत हिनाने असं लिहिलयं की, थोडीशी पॅपरिंग. याशिवाय तिने लिहिले की, रॉकी द रॉक ऑफ माय लाईफ. 

 

हिना आणि रॉकीची पहिली भेट हिनाची पहिली मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेदरम्यान झाली होती. दोघेही २०१४मध्य एकमेकांना भेटले होते तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकत्र आपले फोटो तसेच व्हिडिओज शेअर करत असतात. आता दोघेही मिलानमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. 

हिना कान्समध्ये आपला पहिला पदार्पणातील सिनेमा लाईन्ससाठी पोहोचली होती. तेथे तिच्या सिनेमाच्या पोस्टरचे लाँचिंगही झाले होते. लाईन्स हा सिनेमा नाजिया नावाच्या एका मुलीवर आधारित आहे जी देशाच्या सीमेजवळील भागात राहते आणि आपल्या रोजच्या आयुष्यात तिने अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागले. लाईन्सच्या पोस्टरमध्ये हिना खान दोन बिंदी घातलेल्या लूकमध्ये दिसली होती. पोस्टरमध्ये हिनाचा केवळ चेहरा दिसत असून त्याच्यासमोर कांट्यांच्या तारा आहेत. या पोस्टरमध्ये ती घाबरलेली दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tum ho❤️

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

कान्समध्ये हिना खानचा जलवा

हिना खानने यंदाच्या वर्षी पहिल्यांदा कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिचा लूक अतिशय स्टनिंग दिसत होता. हिना खानने कान्स फेस्टिव्हलमध्ये डार्क सिल्व्हर मेटॅलिक गाऊन घातला होता. तसेच तिने या आऊटफिटसोबत फार कमी ज्वेलरी कॅरी केली होती. तिने कानात एअररिंग्स घातले होते तर सिल्व्हर शाईन असलेले हिल्स कॅरी केले होते. हिनाने यावेळी साधी आणि सिंपल हेअरस्टाई केली होती. एका बाजूच्या केसांना मागच्या बाजूने बांधले होते तर दुसरे केस मोकळे सोडले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
इटलीच्या रस्त्यांवर हिना खानने सगळ्यांसमोर केले बॉयफ्रेंडला किस Description: हिना खान नुकती ७२व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली होती. यानंतर ती इटलीच्या मिलान शहरात आपल्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे. तिथे तेथील फोटोज आणि व्हिडिओजही शेअर केले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles