Janhvi Kapoorपासून ते प्रियंका चोप्रापर्यंत, WhatsApp ग्रुपमध्ये करतात ही चर्चा

झगमगाट
Updated Oct 21, 2021 | 18:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

जान्हवी कपूर पासून ते करीना कपूर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय काय बोलत असतात हे आम्ही तुम्हाला सांगतोय. वाचा संपूर्ण बातमी.

kareena kapoor
Janhvi ते priyanka पर्यंत, WhatsApp ग्रुपवर करतात चर्चा 
थोडं पण कामाचं
  • दीपिका पदुकोणने २०२०मध्ये आपल्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक शानदार स्क्रीनशॉट पाठवला होता.
  • २०१९मध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन कॉफी विथ करणमध्ये दिसले होते. त्या
  • एका जु्न्या कॉफी विथ करण एपिसोडमध्ये करीना कपूरन व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत सांगितले होते.

मुंबई: व्हॉट्सअॅप ग्रुपवर जितकी चर्चा सामान्य लोक करत असतील तितकीच बॉलिवूड सेलिब्रेटीही. आजकाल हे गरजेचे बनले आहे. अधिकतर सेलिब्रेटी एकमेकांच्या जीवनाचे अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करता. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल की यांच्या ग्रुपमध्ये काय बोलणी होत असतील. 

बच्चन कुटुंबाचा फॅमिली ग्रप

२०१९मध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची बहीण श्वेता बच्चन कॉफी विथ करणमध्ये दिसले होते. त्यादरम्यान खुलासा झाला होता की त्यांच्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काय सुरू असते. जया बच्चन ही ग्रुपमध्ये खूप सक्रिय असते आणि गुड मॉर्निंग आणि गुडनाईट फॉरवर्ड पाठवत असते. दुसरीकडे ऐश्वर्या ग्रुपमध्ये सगळ्यात कमी सक्रिय असते.मेसेजचे उत्तर देण्यास खूप वेळलावते. जेव्हा ग्रुपमधील कोणी प्रवास करत असेल तर त्याचे अपडेट ग्रुपवर दिले जातात. 

दीपिकानेही दाखवला होता व्हॉट्सअॅप ग्रुप

दीपिका पदुकोणने २०२०मध्ये आपल्या फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक शानदार स्क्रीनशॉट पाठवला होता. यात तिचे आई-वडील अम्मा आणि पप्पा सामील होत. तिच्या नवऱ्याचे नाव हँडसम म्हणून सेव्ह होते. तिच्या सासऱ्यांचा नंबर जगजीत सिंह भवनानी असा सेव्ह होता. 

प्रियंकाचाही आहे भावंडांचा ग्रुप

हिंदुस्तान टाईम्सला २०१८मध्ये दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राची बहीण मन्नाराने खुलासा केला होता की सर्व चुलत भाऊ-बहीण हे द चोप्रा या ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात असतात. यात १४ लोक जोडले गेलेत. तसेच सांगितले की ते आपल्या आयुष्यात काय करतायत याचे एकमेकांना अपडेट देत असतात तसेच आपल्या प्रवासाचे फोटो शेअर करत असतात. 

जान्हवी कपूरचा ग्रुप

२०१९मध्ये बोनी कपूरची मुलगी अंशुलाहिने आपल्या इन्स्टाग्रामवर फॅमिली ग्रुप चॅटचा एक फोटो शेअर केला होता. ग्रुपला 'Dad's kids' हे नाव देण्यात आले होते. यात सर्व मुले आपले वडील बोनी कपूर यांना आपल्या लोकेशनची माहिती देत होते. या ग्रुपमध्ये खुशी कपूर, जान्हवी कपूर अर्जुन कपूर आणि अंशुला यांचा समावेश आहे. 

करीना कपूरचा व्हॉट्सअॅप ग्रुप

एका जु्न्या कॉफी विथ करण एपिसोडमध्ये करीना कपूरन व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत सांगितले होते. या ग्रुपमध्ये तिच्या सगळ्यात जवळचे मित्र मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि करण जोहर यांचा समावेश आहे. या ग्रुपला गट्सहे नाव देण्यात आले आहे. सोबतच सेलिब्रेटी आपल्या हिमतीवर यावर गोष्टी करतात. सोबतच फॅशन सेन्स, स्टेटमेंटवरही खूप चर्चाहोते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी