मुंबई: Jeev Majha Guntala Mangalagaur Special: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) 'जीव माझा गुंतला' (Jeev Majha Guntala) मालिकेनं खूप कमी कालावधीतच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकलं आहे. आता मालिकेत खानविलकरांच्या घरामध्ये (Khanwilkar's house) मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी होणार आहे. अंतराची ही पहिली मंगळागौर (mangalagaur) असणार आहे. (Jeev Majha Guntala colors marathi Aantras First Mangalagaur special video)
जीव माझा गुंतला मालिकेत खानविलकर घरामध्ये मोठ्या उत्साहात अंतराच्या पहिल्या मंगळागौरीची तयारी केली आहे. मंगळागौरच्या खास कार्यक्रमासाठी अंतराने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत.
अधिक वाचा- उपराजधानीला काळजी घेण्याची गरज, जिल्ह्यात Swine Flu चं थैमान; नागरिकांमध्ये वाढली धाकधूक
अंतरासोबत असलेल्या महिलांनीही पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. अंतरासोबतच चित्रा काकी, श्वेता, आजी, सुहासिनी आणि इतर महिला देखील अतिशय सुंदर तयार झालेल्या दिसत आहेत.
जीव माझा गुंतला मालिकेत मंगळागौरचे खास व्हिडिओ समोर आले आहेत. मालिकेत तयार झालेल्या सर्व महिला मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत. यावेळी पारंपारिकरित्या मंगळागौरीची पूजा देखील करण्यात येणार आहे.
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत साजरी होणार अंतराची पहिली मंगळागौर pic.twitter.com/IBftIPzNWz — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 27, 2022
जीव माझा गुंतला मालिकेचा मंगळागौर विशेष भाग प्रेक्षकांना दोन दिवस पाहता येणार आहे.
'जीव माझा गुंतला' मालिकेत अंतराची भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण साकारत आहे. याआधी तिने काही मराठी सिनेमा आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तसेच मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुलेने साकारत आहे. सौरभ एक उत्तम अभिनेता असून एक फोटोग्राफर आहे. त्याने अनेक हिंदी-मराठी कलाकरांसोबत काम केलं आहे.
खानविलकर घरामध्ये उत्साहाचे वातावरण ! pic.twitter.com/iA3o4h0Y3d — Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 27, 2022
अंतरा आणि मल्हारची जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. मालिकेत अधूनमधुन अंतरा आणि मल्हारच्या जोडीचे रोमँटिक सीन लोकांना पाहायला खूप आवडतात.