Jio New Offer : दररोज २.५ जीबी डेटा मिळणार, वर्षभर नवीन रिचार्ज करण्याची नाही गरज; अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा

Reliance Jio Recharge news in marathi | रिलायन्स जिओच्या ४४ कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कंपनीने सेलिब्रेशन ऑफरसोबतच नवीन २९९९ रूपयांचा नवीन प्लॅन लॉंच केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा कंपनीचा एकमेव असा प्लॅन आहे की ज्यामध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा मिळणार आहे.

Jio New Offer will get 2.5 GB of data per day no need to recharge all year round and Unlimited calling facility
जिओची नवीन ऑफर दररोज २.५ जीबी डेटा मिळणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कंपनीने सेलिब्रेशन ऑफरसोबतच नवीन २९९९ रूपयांचा नवीन प्लॅन लॉंच केला आहे.
  • हा प्लॅन वर्षभराची वैधता असलेला एकमेव प्लॅन आहे. म्हणजेच २९९९ रूपयेच्या एका रिचार्वर ३६४ दिवसांपर्यंत वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी २.५ जीबी डेटा मिळणार आहे.
  • जिओच्या या प्लॅनमध्ये ८.२२ रुपयाच्या प्रत्येक दिवशीच्या खर्चाने ३६५ दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळेल. तर ३६५ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डेटासह कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत २८७९ रुपये आहे.

Reliance Jio Recharge | नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ४४ कोटी युजर्संसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कंपनीने सेलिब्रेशन ऑफरसोबतच नवीन २९९९ रूपयांचा नवीन प्लॅन लॉंच केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा कंपनीचा एकमेव असा प्लॅन आहे की ज्यामध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा मिळणार आहे. तर या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच या एका सिंगल रिचार्जमुळे संपूर्ण वर्षभराची चिंता मिटणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये युजर्संना अनेक वेगवेगळे फायदे देखील मिळणार आहे. (Jio New Offer will get 2.5 GB of data per day no need to recharge all year round and Unlimited calling facility).  

Reliance Jio IPO | अंबानींच्या जिओचा बहुप्रतिक्षित आयपीओ यावर्षी येऊ शकतो, गुंतवणुकीतून तुफान कमाईची संधी


२९९९ च्या प्लॅनमध्ये अनेक फायदे

दरम्यान, हा प्लॅन वर्षभराची वैधता असलेला एकमेव प्लॅन आहे. म्हणजेच २९९९ रूपयेच्या एका रिचार्वर ३६४ दिवसांपर्यंत वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी २.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच वर्षभरात एकूण या प्लॅनमध्ये ९१२. जीबी डेटा दिला जाईल. लक्षणीय बाब म्हणजे इंटरनेटचे डेली लिमिट संपल्यानंतर देखील ६४ kbps च्या वेगाने इंटरनेट चालेल. प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड मोफत कॉलिंग देखील उपलब्ध असेल. दररोज १०० एसएमएस देखील दिले जातील. जिओच्या लोकप्रिय ॲप्स जसे की जिओ टिव्ही (Jio TV), जिओ सिनेमा (Jio Cinema), जिओ सुरक्षा (Jio Security), जिओ क्लाउड (Jio Cloud) आणि इतरांसाठी सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल.

Prepaid Plan | रिलायन्स जिओने परत आणला ४९९ रुपयांचा प्लॅन, वाढवली हॅप्पी न्यू ऑफर !

१२० रुपयांमध्ये वर्षभर ५०० एमबी (MB) अतिरिक्त (Extra) डेटा

जिओच्या या प्लॅनमध्ये ८.२२ रुपयाच्या प्रत्येक दिवशीच्या खर्चाने ३६५ दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळेल. तर ३६५ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डेटासह कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत २८७९ रुपये आहे. म्हणजेच १२० रुपये अधिक भरल्यास, युजर्संना ३६५ दिवसांसाठी दररोज ५०० एमबी (MB) अधिक डेटा मिळेल. एकूण एका वर्षात १८२.५ जीबी डेटा उपलब्ध होईल.

Jio Recharge Plan : दररोज ३ जीबी डेटा आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह Jio चा हा आहे सर्वात स्वस्त रिचार्ज

४९९ रूपयांत अनलिमिटेड मनोरंजन पॅक

जिओने ४९९ रुपयांचा प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) चे वार्षिक सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग ६४ केबीपीएस होईल. प्लॅनवर २८ दिवसांची वैधता उपलब्ध असेल. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मेसेज (SMS) देखील उपलब्ध असतील. Jio Cinema, Jio TV सारख्या सर्व Jio ॲप्समध्ये प्रवेश देखील दिला जाईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी