२५ वर्षीय पॉप सिंगरचा मृत्यू, घरात आढळला मृतदेह

झगमगाट
Updated Oct 15, 2019 | 08:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

K-pop Singer Sulli found dead: २५ वर्षीय के-पॉप स्टार सुली आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. सुलीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

k pop singer sulli dead
२५ वर्षीय पॉप सिंगरचा मृत्यू, घरात आढळला मृतदेह  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • २५ वर्षीय के-पॉप स्टार सुली आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली
  • गायिका सुलीच्या मॅनेजरला ती घरात मृतावस्थेत आढळली
  • गायिका सुलीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ
  • पोलीस तपास सुरु

दक्षिण कोरियातील सियोल जवळ एक २५ वर्षीय के-पॉप स्टार सुली आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गायिका सुलीच्या मॅनेजरने ती मृतावस्थेत असल्याचं पाहिलं. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

पॉप स्टार सुलीच्या मृत्यू चं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. बँड एफ(एक्स) ची सदस्य राहिलेल्या सुलीचं खरं नाव चोई जिन-री आहे. पॉप स्टार सुली खूपच प्रसिद्ध होती. सुलीचे इंस्टाग्रामवर ५० लाख फॉलोअर्स आहेत. आपल्या अभिनय आणि करिअरमध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी पॉप स्टार सुलीने २०१५ मध्ये बँड सोडण्याचा निर्णय घेतला होता. वृत्तांनुसार, ऑनलाइन होत असलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे सुली ने आपल्या के-पॉप वर्कपासून काहीवेळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

밀라노 #TheNightIsYours #PressResetTonight #푹잔듯한피부 #갈색병 #에스티로더

A post shared by 설리가진리 (Sulli) (@jelly_jilli) on

आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, पॉप स्टार सुलीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. "सुली आपल्या घरात एकटीच राहत होती. तीने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पण, या प्रकरणी आम्ही इतरही बाबी तपासून पाहत असून आमचा तपास सुरु आहे" असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 설리가진리 (Sulli) (@jelly_jilli) on

पॉप स्टार गायिका सुलीने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं ते बालपणीच. बालपणी अभिनय करुन सुलीने सर्वांची मन जिंकली. त्यानंतर सुलीने मागे वळून पाहिलंच नाही. सुली हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी