Karan Johar: 'या' दोन अभिनेत्रींच्या मुलांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, करण जोहर करणार लॉन्च?

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 14:51 IST

Malaika Arora And Madhuri Dixit Son In Bollywood Debut: अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित( Madhuri Dixit)आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या मुलांना करण लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

Karan johar
करण जोहर 
थोडं पण कामाचं
  • दिग्दर्शक, अभिनेता करण जोहरनं (Karan Johar) अनेक स्टार किड्सला लॉन्च केलं आहे.
  • अशी अनेक स्टार किड्स आहेत जी सिनेमांमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतात.
  • सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान करण जोहरच्या अपकमिंग रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू करत आहे.

मुंबई: Karan johar launching malaika arora madhuri dixits son: आतापर्यंत निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता करण जोहरनं (Karan Johar) अनेक स्टार किड्सला लॉन्च केलं आहे. आता करण जोहर आणखी दोन स्टार किड्सला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हो हे खरं आहे. अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित( Madhuri Dixit)आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)  यांच्या मुलांना करण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण हे दोन्ही स्टार किड्स अभिनेते म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहेत.

अशी अनेक स्टार किड्स आहेत जी सिनेमांमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतात. करण जोहरनं अनेक स्टार किड्स लाँच केलेले आपण पाहिलं असेल. त्याच वेळी, अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी अनेकजण त्यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतात. आता सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान करण जोहरच्या अपकमिंग रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू करत आहे. 

अधिक वाचा-  ​रक्षाबंधनासाठी बनवा सोपे आणि चविष्ट शेंगदाण्याचे लाडू

मात्र केवळ इब्राहिमच नाही तर आणखी 2 स्टार किड्स याद्वारे सहाय्यक दिग्दर्शकाचे काम सुरू करणार आहेत. मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान आणि माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन हे स्टार्स किड्स आता बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून एन्ट्री करत आहेत.

अरहान आणि अरिन सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणार काम

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, करणच्या या सिनेमात अरबाज आणि अरिन सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. रॉकी आणि राणीची प्रेम कहाणीमध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

निरवान ही करतोय काम

सोहेल खानचा मुलगा निरवान खान देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. तो सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमात काम करत आहे. रॉकी आणि राणी या सिनेमाच्या प्रेमकथेबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच संपलं आहे. आलियाने गरोदरपणात या सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूलमध्येही काम केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया आणि रणवीरची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. यापूर्वी दोघांनी गली बॉय या सिनेमात काम केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी