Actress Kareena Kapoor Khan Pregnancy: करीना कपूर तिसऱ्यांदा Pregnant?,चर्चेवर दिलं बेबो स्टाईल फनी उत्तर; म्हणाली...

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 20, 2022 | 16:23 IST

Actress Kareena Kapoor Khan: हे फोटो बघून लोकांनी ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला. या फोटोंमध्ये करीनाचं पोट बघून लोकांनी करीनाचं बेबी बंप असल्याचं समजलं. त्यानंतर लोकांनी करीनाला तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे प्रश्न विचारू लागले.

Actress Kareena Kapoor Khan and saif ali khan
करिना कपूर खान आणि सैफ अली खान  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री करीना कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan) तिच्या प्रेग्नेंसीमुळे (Pregnancy) बरीच चर्चेत आहे.
  • करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
  • करीनानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते.

मुंबई:  Actress Kareena Kapoor Khan Pregnancy Rumours: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री करीना कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan)  तिच्या प्रेग्नेंसीमुळे   (Pregnancy) बरीच चर्चेत आहे. करीना तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. करीनानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले होते. हे फोटो बघून लोकांनी ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला. या फोटोंमध्ये करीनाचं पोट बघून लोकांनी करीनाचं बेबी बंप असल्याचं समजलं. त्यानंतर लोकांनी करीनाला तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे प्रश्न विचारू लागले. त्यावर प्रेग्नेंसीची आणखीन चर्चा होण्याआधी अभिनेत्रीनं सोशल मीडियावरूनच एक भन्नाट उत्तर दिलं आहे. 

या चर्चांना अभिनेत्रींनं फूल स्टॉप दिला आहे. तिनं इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रेग्नेंसीच्या बातमीवर उत्तर दिलं आहे. करीना कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये सांगितलं की ती प्रेग्नेंट नाही आहे. हे सर्व पास्ता आणि वाईनमुळे झालं आहे.

अधिक वाचा-  40 व्या बर्थडेला निककडून प्रियंकाला स्पेशल Birthday Gift

करीना कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, "हे पास्ता आणि वाइन आहे. शांत व्हा. मी प्रेग्नेंट नाही. उफ्फ्फ.. सैफ म्हणाला की त्याने आधीच देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी अधिक योगदान दिलं आहे. KKK चा आनंद घ्या." 

Kareena Kapoor khan

करीना कपूरनं तिच्या पोस्टवरून स्पष्ट केलं की ती प्रेग्नेंट नाही. अभिनेत्रीनं दिलेल्या मजेशीर उत्तर ही लोकं पसंत करत आहेत. हे कॅप्शन लिहिताना करिनाने हसणारे दोन इमोजीही पोस्ट केले आहेत. 

करीनाचा एक फोटो समोर आला होता, ज्यात ती सैफ अली खानसोबत वाईन आणि पास्ताचा आस्वाद घेताना दिसली. लंडनच्या सुट्टीतल्या या फोटोंमध्ये करीना कपूर खान प्रेग्नेंट असल्यासारखी दिसत होती. 

आजकाल करीना कपूर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत अभिनेत्री स्वतःशी संबंधित अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता करीनानं तिसर्‍या प्रेग्नंसीबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. बेबोनं फनी स्टाइलमध्ये या बातमीचं खंडन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी