... म्हणून मी अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं; अखेर Kareena kapoor मनातलं बोलली

झगमगाट
Updated Mar 27, 2023 | 15:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kareena Kapoor Saif Ali Khan Marriag: अभिनेत्री करीना कपूर तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. अलीकडेच करिनाने एका मुलाखतीत सैफ अली खानसोबत लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला. करीनाच्या या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे.

 Kareena Kapoor Khan opens up about marrying Saif Ali Khan
अखेर Kareena kapoor बोलली; का केलं सैफ अली खानसोबत लग्न?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री करीना कपूर कायमच चर्चेत
  • सैफ अली खानसोबत लग्न करण्याबाबत मोठा खुलासा
  • करिअरची चिंता होती तेव्हा मी लग्न केल

Kareena Kapoor Saif Ali Khan Love Story: अभिनेत्री करीना कपूर तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. अलीकडेच करिनाने एका मुलाखतीत सैफ अली खानसोबत लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला. करीनाच्या या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे.  (Kareena Kapoor Khan opens up about marrying Saif Ali Khan )

करिनाने या मुलाखतीत सांगितले की, तिने सैफशी अशा वेळी लग्न केले जेव्हा बॉलिवूडमध्ये कोणती अभिनेत्री लग्न करण्याचा विचार करत नव्हती. करीना म्हणाली, 'मी आनंदी वातावरणात आहे कारण मला जे हवे होते ते मी केले आणि मी खूप भाग्यवान आहे. जेव्हा मला लग्न करायचं होतं, तेव्हा मी केलं आणि तेही जेव्हा अनेक अभिनेत्री लग्न करण्यास टाळाटाळ करत होत्या त्यांना त्यांच्या करिअरची चिंता होती तेव्हा मी लग्न केल.'

अधिक वाचा: Nawazuddin Siddhiqi : अभिनेता नवाजुद्दीनने भाऊ आणि एक्स पत्नीविरुद्ध 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला

'आज अनेक अभिनेत्री लग्न करत आहेत. लग्न करूनही काम करता येते हा अचानक एक छान ट्रेंड बनला आहे. पूर्वी लग्नानंतर मुले जन्माला घालताना विचार केला जायचा. पण आता हा समजही मोडित निघाला आहे. तुम्ही मुले झाल्यावरही काम करू शकता. मी नेहमीच मला जे आवडते तेच केले आहे.', असेही करीना म्हणाली. 

अधिक वाचा: Pushpa:तेलुगू चित्रपटात नव्हता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा झुकेगा नहीं साला' डायलॉग; का बदलण्यात आला संवाद

सैफ आणि करिनाचे लग्न 2012 मध्ये झाले होते. 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ आले, त्यानंतर त्यांनी डेटिंगचा काळ एन्जॉय केला आणि त्यानंतर लिव्ह-इनमध्ये राहून लग्न केले. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. करीना लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतरही बॉलिवूडमध्ये सक्रिय राहिली. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. करीना 2016 मध्ये पहिल्यांदा आई झाली, तिने तैमूर अली खानला जन्म दिला. यानंतर दुस-या गरोदरपणात तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग केले. काही महिन्यांच्या गरोदरपणानंतर तिने कामातून ब्रेक घेतला, मात्र  ती पुन्हा चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी