Katrina Kaif Honeymoon Pics: कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज; विकीची स्माइल तर चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

katrina kaif and vicky kaushal | बॉलिवूडचे नवनिर्वाचित जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नानंतर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. हे जोडपे नेहमीच नवनवीन फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना व्हिज्युअल पध्दतीने भेट देताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे #Vickkat चे चाहते देखील त्यांच्या नवीन फोटोंची आणि त्यांचा नवा अंदाज पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

 Katrina Kaif's Glamorous look in honeymoon photos while Vicky beautiful Smile
कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कतरिना आणि विकी हे बॉलिवूडचे नवनिर्वाचित जोडपं लग्नानंतर नेहमीच चर्चेत राहिले आहे.
  • अभिनेत्री कतरिना कैफने हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
  • फोटोंमध्ये कॅटने डार्क हिरवा आणि पांढरा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

katrina kaif and vicky kaushal  honeymoon photos ​ | मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) नवनिर्वाचित जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नानंतर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. हे जोडपे नेहमीच नवनवीन फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना व्हिज्युअल पध्दतीने भेट देताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे #Vickkat चे चाहते देखील त्यांच्या नवीन फोटोंची आणि त्यांचा नवा अंदाज पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दोघांनीही लग्नानंतर लगेचच त्यांचे फोटो शेअर करून चाहत्यांना भेट दिली आहे. अलीकडेच त्यांच्या लग्नातील हळदी, मेहंदी आणि डान्सच्या फोटोंनी सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातला होता. दरम्यान आता पहिल्यांदाच या लोकप्रिय अभिनेत्रीने त्यांच्या हनीमूनच्या काही झलक चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Katrina Kaif's Glamorous look in honeymoon photos while Vicky beautiful Smile).   

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले की, "#myhappyplace." फोटोंमध्ये कॅटने डार्क हिरवा आणि पांढरा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. फोटोंमध्ये ती कॅमेऱ्यापासून दूर पाहत हसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

अभिनेत्रीची पोस्ट बघितल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सने देखील आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान एका युजर्सने लिहले की, "हनीमून फोटोंमध्ये विकी पाजी कुठे आहे? दोघांचे एकत्र फोटो ठेवा", एका आणखी युजर्सने लिहले की, लाखो जिवांची राणी" सांगितले. जवळजवळ दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, विकी आणि कतरिनाने ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे एका जिव्हाळ्याच्या समारंभात लग्न केले. मालविका मोहनन, नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान, मिनी माथूर, गुरदास मान आणि शर्वरी वाघ यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश असलेल्या या लग्नाला केवळ १२० पाहुणे उपस्थित होते.

लग्नानंतर लगेचच हे जोडपे हनिमूनला गेले आणि काही दिवसांतच मुंबईला परतले. त्याच्या कामाबाबत भाष्य करायचे झाले तर कतरिनाने श्रीराम राघवनसोबत 'मेरी ख्रिसमस' नावाच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. याशिवाय फोन भूत, टायगर ३ आणि जी ले जरा सारखे चित्रपट देखील पाइपलाइनमध्ये आहेत. दरम्यान, विकी सध्या इंदौरमध्ये सारा अली खानसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय त्याच्याकडे सॅम बहादूर, गोविंदा नाम मेरा आणि लक्ष्मण उतेकर यांच्यासोबतचा पुढील चित्रपट आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी