Khatron Ke Khiladi 12: एलिमिनेशन टास्कमध्ये रूबिना दिलाइक गंभीर जखमी, सेटवरून समोर आला व्हिडिओ

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 11, 2022 | 16:25 IST

Khatron Ke Khiladi 12: सिने निर्माता रोहित शेट्टीनं हा कार्यक्रम होस्ट केला आहे. शोमध्ये आवडत्या स्पर्धकांना बोल्ड टास्क करताना पाहण्यासाठी चाहते वीकेंडची वाट पाहत असतात.

 Rubina Dilaik
रुबीना दिलाइक 
थोडं पण कामाचं
  • खतरों के खिलाडीचा 12वा सीझन सुरू झाला आहे.
  • खतरों के खिलाडी हा कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे.
  • एलिमिनेशनमध्ये रुबिना दिलाइक आणि निशांत भट्ट यांना टाकण्यात आलं.

मुंबई: Khatron Ke Khiladi 12: खतरों के खिलाडीचा 12वा सीझन सुरू झाला आहे. खतरों के खिलाडी हा कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. सिने निर्माता रोहित शेट्टीनं हा कार्यक्रम होस्ट केला आहे.  शोमध्ये आवडत्या स्पर्धकांना बोल्ड टास्क करताना पाहण्यासाठी चाहते वीकेंडची वाट पाहत असतात.  मेकर्स सतत खतरों के खिलाडीचे नवनवीन प्रोमो शेअर करत असतात. आता अलीकडेच रोहित शेट्टी Vs कंटेस्टंट्स टास्क ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व स्टार्सनी टीमसाठी एक एक करून स्टार्स जिंकायचे होते. मात्र यात स्पर्धक अपयशी ठरले आणि रोहित शेट्टीच्या अटीनुसार, परस्पर संमतीने 2 स्टार एलिमिनेशन झोनमध्ये टाकण्यात आले.

एलिमिनेशनमध्ये रुबिना दिलाइक आणि निशांत भट्ट यांना टाकण्यात आलं. मात्र यावेळी टास्क करताना रुबिना जखमी झाली. रुबिना दिलाइक शोमधील स्पर्धकांपैकी एक आहे. खतरों के खिलाडी 12 निर्मात्यांनी एक प्रोमो शेअर केला आहे.  जारी केलेल्या प्रोमोमध्ये अभिनेत्री ओरडताना दिसत आहे. 

अधिक वाचा- वेगन चॉकलेट केकची सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी 

हा व्हिडिओ एलिमिनेशन टास्क दरम्यानचा आहे जेव्हा खतरों के खिलाडी-12 मध्ये बर्फात एलिमिनेशन टास्क करत असताना रुबिना दिलाइक खूप वाईटरित्या किंचाळताना दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

टास्क सुरू असताना दिलाइक काचेच्या कंटेनरमध्ये बंद होते. त्यानंतर रुबिना देवाच्या नावाचा जप करू लागते, व्हिडिओमध्ये तिला हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे… म्हणतानाही ऐकताना आपण बघू शकतो. टास्कमध्ये रुबिना दिलाइकवर स्नोफ्लेक्सचा वर्षाव झाल्याचंही तुम्ही बघू शकता. बर्फाचे तुकडे पडत असताना ती ओरडते. स्नोफ्लेक्स पडण्याचा वेग इतका वेगवान होता की तिच्या जवळजवळ सर्व हातातून रक्तस्त्राव होऊ लागला आणि ती गंभीर जखमी झाली.

रुबिना शोच्या सर्वात स्ट्रॉग स्पर्धकांपैकी एक आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे आणि स्पर्धात्मकतेमुळे, ती रोहित शेट्टी शोची विजेती असू शकते अशी ही चर्चा पसरली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी