Samrat Prithviraj Movie : अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेेला सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्यावर अनेकजण तोंडसुख घेत असल्याचं चित्र आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान यानंही एक ट्विट करत अक्षय कुमारचा समाचार घेतला आहे. त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा का फ्लॉप झाला? कारण सगळे भक्त गरीब झाले आहेत आणि त्यांच्याकडे सिनेमाचं तिकीट काढण्यापुरतेही पैसे उरलेले नाहीत. त्यामुळेच ते केवळ सोशल मीडियावर चित्रपटाचं समर्थन करू शकतात.”
Why #Dhakad and #SamratPrithviraj are disasters? Because all the Bhakts have become poor and now they are not having money to buy ticket to watch a film. So They can just support on social media only. — KRK (@kamaalrkhan) June 5, 2022
कमाल आर. खान हा अभिनेता चित्रपट समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चित्रपट यांची तो सतत समीक्षा करत असतो. आपली रोखठोक मतं कुणाचीही भिती न बाळगता तो नोंदवत असतो. अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज सिनेमावरून त्याने केलेल्या टीकेनंतर उलटसुलट चर्चा रंगली आहे. अनेकजण अक्षय कुमारवर टीका करत आहेत, तर काहीजण कमाल आर. खानवर तोंडसुख घेत आहेत.
भक्तांकडे पैसे नसल्यामुळे ते चित्रपटाचं तिकीट काढू शकत नाहीत, त्यामुळे लवकरच अक्षय कुमारला कॅनडातील मूळ शहर असलेल्या टोरँटोला जावं लागेल, असं त्यानं म्हटलं आहे. पूर्ण भारतीय जनता पक्षही हा सिनेमा वाचवू शकला नाही. काही चित्रपटांसाठी मला कठोर मेहनत घ्यावी लागते आणि सम्राट पृथ्वीराज सिनेमासाठी तशी मेहनत मी घेतली आहे, असं उपरोधिक ट्विटही त्याने केलं आहे.
अधिक वाचा - Ashram 3: आश्रम 3 ची जादू चालली , 32 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज
अक्षय कुमारच्या फॅन्सनी कमाल आर. खानला उत्तर दिलंय. अक्षय कुमार हा सर्वात बिझी अभिनेता असून या वर्षी त्याचे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. इतर पाच चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. 35 ब्रँडची जाहीरातही अक्षय कुमार करत आहे. 2035 सालापर्यंत एकही डेट त्याच्याकडे शिल्लक नाही. अशा परिस्थितीत तो कॅनडाला परत का जाईल, असा सवाल अक्षय कुमारच्या चाहत्यांनी ट्विटरवरून विचारला आहे.
टिल्लू नावाचा एक युजर म्हणतो, “अक्षय कुमार कॅनडाला जाण्याची गोष्ट सोडा, तुम्ही कधी भारतात येऊ शकाल का, याचा विचार करा. इतरांचा विचार करण्याऐवजी स्वतःचा विचार करा. इतरांविषयी कधी तरी काही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. केजीएफ-2 बाबतही आपण खराब रिव्हू दिला होता. मात्र प्रत्यक्षात चित्रपट चांगलाच हिट झाला. तुमची ती चूक तुम्ही मान्य करणार आहात का?”
अधिक वाचा - Exclusive: सलीम खान- सलमान खान तुमचा करणार मूसेवाला, 'दबंग'च्या पत्राचं तिहार कनेक्शन!
सम्राट पृथ्वीराज या सिनेमाचं बजेट 300 कोटींचं आहे. या सिनेमानं रविवारपर्यंत 39.2 कोटींची कमाई केली आहे. 5 जून रोजी हिंदी पट्ट्यात 33 टक्के स्क्रीन्सवर हा चित्रपट सुरू होता.