Life Threat to Salman Khan : चित्रपट अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी (Life Threat) मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांमध्ये (Family Members) चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ही धमकी पोलिसांनीही (Police) गांभिर्यानं घेतली असून सलमान खानच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना लागू करायला सुरुवात केली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांना पत्र पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. तुमच्या मुलाला आम्ही ठार मारू, असं या पत्रात म्हटलं आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान हे रोजच्याप्रमाणे सकाळच्या वेळी जॉगिंगसाठी गेले होते. व्यायाम झाल्यानंतर ते एका बाकावर आराम करण्यासाठी बसले. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे पत्र दिले आणि तिथून पळ काढला. त्यांनी पत्र उघडून वाचले. तुमचा मुलगा सलमान खान याला आम्ही जीवे मारू, अशी धमकी त्यात देण्यात आली होती. सलमान खानचा आम्ही सिद्धू मुसेवाला करू, असं या पत्रात म्हटलं होतं.
सलमान खानला धमकी मिळाल्याचं समजताच त्याच्या भावांनी त्याच्या घरी धाव घेत विचारपूस केली. सलमान खान आणि सोहेल खान हे सलमानच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी सुरक्षेचाही आढावा घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्टपणे दिसत होतं.
धमकीची माहिती मिळाल्यानंतर सीबीआयचे अधिकारी सलमान खानच्या घरी पोहोचले. त्यांनी सर्व चौकशी केली असून ही धमकी कुणी दिली असावी, याचा तपास सुरू केला आहे. अद्याप सीबीआयकडून कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.
यापूर्वीदेखील अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रेड्डी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानला मारण्याचा प्लॅन लॉरेन्स विश्र्नोईनं केला असल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या शार्प शूटर्सना त्यावेळी आवश्यक ती शस्त्रास्त्रं उपलब्ध होऊ शकली नाहीत, असं सांगितलं जातं. आता पुन्हा एकदा सलमान खानला मारण्याची धमकी नेमकी कुी दिली असावी, याचा शोध सुरू आहे.
ही धमकी नेमकी कुठल्या कारणासाठी देण्यात आली, हे अद्याप समोर आलेलं नाही. या पत्रात LB असं लिहिलं असल्यामुळे लॉरेन्स बिश्र्नोईवर पोलिसांना संशय आहे. त्याच्या सांगण्यावरूनच हे पत्र लिहिण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. सलीम खान ज्या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.