IMDB Top Rated Series : हिंदीतील या वेब सिरीजना सर्वाधिक पसंती, जाणून घ्या TOP 5 मालिका

वेब सीरिजनी मालिकांचा दर्जा सुधारला असून चांगलं आणि वेगळं पाहण्याचा चॉईस प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला आहे. बघुया प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलेल्या वेब सीरिज कुठल्या आहेत.

IMDB Top Rated Series
हिंदीतील या वेब सीरिजना सर्वाधिक पसंती  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • IMDB वर सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या पाच वेब सीरिज
  • 'द स्कॅम'ला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती
  • सर्व वेब सीरिजला उत्तम कंटेंटसाठी प्रेक्षकांची पसंती

IMDB Top Rated Series : हिंदी भाषेत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध असून दर महिन्यात कित्येक वेब सीरिज रिलीज होत असतात. मात्र त्यापैकी काही निवडक मालिकाच चाहत्यांना आवडतात. IMDB वर उत्तम रेटिंग मिळालेल्या वेब सीरिज या त्यांच्या कंटेंटसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्हालाही उत्तम कथानक असणाऱ्या वेब सीरिज पाहायच्या असतील, तर या यादीतील मालिका तुम्हाला नक्कीच आवडतील.

स्कॅम 1992

स्कॅम 1992 ला IMDB वर 9.3 रेटिंग मिळालं आहे. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ही वेबमालिका सर्वाधिक रेटिंग मिळवणारी ठरली आहे. या मालिकेत प्रतिक गांधी याने लिड रोल केला आहे. हंसल मेहता यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. 

ॲस्पिरंट्स

या मालिकेलाही IMDB वर 9.3 रेटिंग आहे. यूट्यूबवर ही मालिका तुम्ही पाहू शकता. IAS परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचा संघर्ष यावर या मालिकेचं कथानक बेतलेलं आहे. या मालिकेचं कथानक हटके असल्यामुळे प्रेक्षकांनी त्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रत्येकजण वाट पाहत आहे. 

कोटा फॅक्टरी

कोटा फॅक्टरीला IMDB वर 9.1 रेटिंग मिळालं आहे. आयआयटीचं कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील बरेवाईट प्रसंग या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. या सीरिजमधील जितू भैयाच्या पात्रामुळे अभिनेता जितेंद्र कुमार चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज उपलब्ध आहे. 

पंचायत

पंंचायत मालिकेला IMDB वर 8.9 रेटिंग देण्यात आलं आहे. जितेंद्र गुप्ता, नीना गुप्ता आणि रघुवीर यादव यासारखे कसलेले कलाकार यात आहेत. या मालिकेचा दुसरा सीझन नुकताच रिलीज झाला असून तो अनेकांना आवडतो आहे. 

रॉकेट बॉईज

रॉकेट बॉईज या वेब सीरिजला IMDB वर 8.9 रेटिंग आहे. देशाचं भविष्य बदलून टाकणाऱ्या दोन तरुणांची ही कथा आहे सोनी लिव्हवर. ही सीरिजही मस्ट वॉचच्या लिस्टमध्ये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी