राष्ट्रवादी काँग्रेससाठी कभी खुशी कभी गम

झगमगाट
Updated May 23, 2019 | 19:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या दोन नव्या चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्याला आघाडी मिळाली आहे तर दुसऱ्या उमेदवाला मोठी पिछाडी मिळाल्याचे दिसत आहे.

amol kolhe
अमोल कोल्हे  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: लोकसभा निवडणुकांचे कल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या कलानुसार भाजप या निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र दिसत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक जी चुरशीची म्हटली जाणार होती ती एकतर्फीच होणार की काय असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीसाठी या निवडणुकीत कभी खुशी कभी गम असे चित्र आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत दोन नवे चेहरे उतरवले होते. मावळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार याचा मुलगा पार्थ पवारला उमेदवारी दिली होती. मात्र हाती येत आलेल्या कलानुसार पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान, पार्थ पवार हा नवखा चेहरा मिळाल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला फटका बसत आहे का? असा सवाल केला जात आहे. 

दरम्यान, शिरूरमध्ये यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली होती. या जागेवरून अमोल कोल्हे २०हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून राष्ट्रवादीसाठी सकारात्मक चित्र दिसत आहे. त्यामुळे एकाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेससाठी कभी खुशी कभी गम असे चित्र आहे. 

पार्थसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न

लोकसभा निवडणुकीसाठी मावळ येथून पार्थ पवारच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्याच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण जोर लावला होता. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी चित्र वेगळे दिसेल असे साऱ्यांनाच वाटत होते. ऐन निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मावळमध्ये पार्थसमोर तेथील विद्यमान खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांचे होते. 

शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना उमेदवारी

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा मराठी अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांना तिकीट देण्यात आले. या ठिकाणाहून आतापर्यंतच्या कलानुसार अमोल कोल्हे २० हजारांनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी अढळराव यांना चांगलीच लढत दिली. 

यंदाच्या निवडणुकीत या दोन नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली होती. मात्र या निवडणुकीत एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला खुशी तर दुसऱ्या ठिकाणाहून गम पाहायसा मइिशत आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राष्ट्रवादी काँग्रेससाठी कभी खुशी कभी गम Description: राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या दोन नव्या चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्याला आघाडी मिळाली आहे तर दुसऱ्या उमेदवाला मोठी पिछाडी मिळाल्याचे दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles