Madhuri Dixits son donate his hair : माधुरीचा मुलगा रायनने कापले लांब केस, कारण समजल्यानंतर शिल्पा शेट्टीने केलं कौतुक

Madhuri Dixits son donate his hair : राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा धाकटा मुलगा रायन याने आपले केस कर्करोगग्रस्तांना दान केले आहेत. प्राउड मॉम माधुरी दीक्षितने 7 ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडिया हँडलवर मुलगा रायनचा व्हिडिओ शेअर करताना याची माहिती दिली.

Madhuri's son Ryan cut his hair long, because Shilpa Shetty appreciated it
Madhuri Dixits son donate his hair : माधुरीचा मुलगा रायनने कापले लांब केस, कारण समजल्यानंतर शिल्पा शेट्टीने केलं कौतुक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माधुरी दीक्षितचा धाकटा मुलगा रायन याने कापले केस
  • तिच्या सोशल मीडिया हँडलवर मुलगा रायनचा व्हिडिओ शेअर केला
  • आपले केस कर्करोगग्रस्तांना दान केले

Madhuri Dixits son donate his hair : मुंबई : राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा धाकटा मुलगा रायन याने आपले केस कर्करोगग्रस्तांना दान केले आहेत. अभिमानी आई माधुरी दीक्षितने 7 ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडिया हँडलवर मुलगा रायनचा व्हिडिओ शेअर करताना याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीचा मुलगा कर्करोगाच्या रुग्णांना दान करण्यासाठी त्याचे लांब केस कापताना दिसत आहे. माधुरीच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Madhuri's son Ryan cut his hair long, because Shilpa Shetty appreciated it)

इंटरनेटवर माधुरीच्या मुलाचा व्हिडिओ

मुलाचा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने एक हृदयस्पर्शी भावनात्मक नोटही लिहिली आहे. माधुरीने नोटमध्ये सांगितले की, तिचा मुलगा रायनला कॅन्सरसाठी केमोथेरपी घेत असलेल्या लोकांना पाहून खूप वाईट वाटते. त्यामुळे त्यांने कॅन्सर सोसायटीला देणगी देण्यासाठी आपल्या केसांचा बळी दिला. माधुरीने सांगितले की, तिच्या मुलाला इतके लांब केस वाढायला जवळपास 2 वर्षे लागली.

माधुरीने एक इमोशनला नोट लिहिली

माधुरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले - सर्व हीरो कॅप घालत नाहीत, परंतु माझ्या हिरोने घातली. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त मला एक खास गोष्ट सांगायची आहे. कॅन्सरसाठी केमोमधून जात असलेले अनेक लोक पाहून रायनचे मन दुखावले जाते. ते ज्या परिस्थितीला तोंड देत असताना तेव्हा त्यांचे केस गळतात. माझ्या मुलाने त्याचे केस कॅन्सर सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने आम्ही पालक म्हणून खूप आनंदी आणि आर्श्चयचकित आहोत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केसांची ही लांबी वाढण्यासाठी त्याला सुमारे 2 वर्षे लागली आणि ही फाइनल स्टेप होती.

 

शिल्पा-फराहने रायनचे कौतुक केले

माधुरी दीक्षितचा मुलगा रियानच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट सेक्शनमध्ये त्यांची प्रशंसा करत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने कमेंट केली - खूप सुंदर कल्पना. फराह खाननेही माधुरीच्या व्हिडिओवर कमेंट करत रायनचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले - हे किती सेंसिटिव आणि काइंड आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी