Pradip Patwardhan Dies: एक हरहुन्नरी अभिनेता हरपला..! मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 12:43 IST

Pradip Patwardhan Died: मराठीतले ज्येष्ठ अभिनेते (Veteran Marathi Actor)  प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली.

Pradip Patwardhan Died
प्रदीप पटवर्धन यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
 • मराठीतले ज्येष्ठ अभिनेते (Veteran Marathi Actor)  प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचं निधन झालं आहे.
 • त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना येते. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 
 • प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली.

मुंबई: Marathi Actor Pradip Patwardhan Died: मराठीतले ज्येष्ठ अभिनेते (Veteran Marathi Actor)  प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना येते. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1970 झाला. हे एक मराठी अभिनेते होते. प्रदीप पटवर्धन यांनी प्रामुख्याने मराठी सिनेमात काम केलं. 2019 ला प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार (Akhil Bharatiya Natya Parishad Award) मिळाला होता. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. 

अधिक वाचा-  पापाराझीसोबत भिडली तापसी पन्नू, नंतर हात जोडून म्हणते की...; Video Viral

प्रदीप पटवर्धन यांना आधीपासूनच अभिनायाची आवड होती. महाविद्यालयात असल्यापासून त्यांनी एकांकिका स्पर्धेत काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतःला व्यावसायिक नाटकाकडे वळवलं. मराठी सिनेसृष्टीतील एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.

 प्रदीप पटवर्धन यांचे सिनेमे 

 • एक फुल चार हाफ (1991)
 • डान्स पार्टी (1995)
 • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)
 • गोळा बेरीज (2012) 
 • बॉम्बे वेल्वेट (2015)
 • पोलीस लाइन (2016) 
 • एक दोन तीन चार (2016) 
 • परीस 2013
 • थॅक यू विठ्ठला 2017
 • चिरनेर 2019

हे त्यांचे सुप्रसिद्ध सिनेमे आहेत. पटवर्धन यांनी अमोल भावे यांच्या जर्नी प्रेमाची (2017) मध्येही भूमिका केल्या आहेत. या सिनेमात कश्मिरा कुलकर्णी, अभिषेक सेठिया आणि माधव देवचके मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय त्यांनी बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सिनेमा नवरा माझा नवसाचा यात ही काम केलं आहे. याशिवाय त्यांनी चश्मे बहाद्दर, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम,  जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी