Sanotsh Juvekar : मुंबई : मराठी अभिनेता संतोष जुवेकरचा ३६ गुण हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. परंतु अवघ्या आठवडाभरात हा चित्रपट थिएटरमधून उतरला आहे. या मुळे संतोष जुवेकरने एक फेसबुक पोस्ट लिहून खंत व्यक्त केली आहे. आपलीच पाणंस पाठीवर शाबासकीची थाप देत नाहीत अशी खंत व्यक्त करत कांतारा बघा, दक्षिणेतील चित्रपट चांगले आहेत असेही जुवेकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (marathi actor santosh juvekar viral fb post on marathi cinema and kantara)
अधिक वाचा : Yashoda Movie Leak: समंथाचा बहुचर्चित सिनेमा 'यशोदा' रिलीज होताच सोशल मीडियावर लिक, निर्माते चिंतेत
४ नोव्हेंबर रोजी संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांचा ३६ गुण हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संतोष आणि पूर्वाने हा चित्रपट प्रमोटही केला होता. परंतु प्रेक्षकांना हा चित्रपट तितका आवडला नाही. ३६ गुण चित्रपटाच्या आधी कांतारा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मूळचा तेलुगु सिनेमा हा महाराष्ट्रत हिंदी डबमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कुठलीही मोठी स्टारकास्ट नसताना केवळ माऊथ पब्लिसिटीवर या चित्रपटाने प्रेक्षक खेचून आणला होता. हा चित्रट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियातून या चित्रपटाचे कौतुक केले होते. त्यानंतर या चित्रपटाने कोटीची उड्डाणे घेत तेलुगुतला सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. परंतु कांतारा प्रदर्शित झाल्यानंतर ३६ गुण हा चित्रपटही प्रदर्शित झाला. अवघ्या ७ दिवसानंतर हा चित्रपट सर्व चित्रपटगृहातून उतरला. त्यावर संतोष जुवेकरने एक पोस्ट लिहून खंत व्यक्त केली आहे.
संतोषने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपला सिनेमा सगळ्या चित्रपटगृहतून उतरला मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी पहिला थिएटर मधे त्या सगळ्यांना मनापासून प्रेम आणि आभार. कांतारा supperb film नक्की बघा..... South films कम्माल. Dubbed films are superb...... साला कितीही घासा आपलीच माणसं आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देत नाहीत आणि किंमत करत नाहीत. माझी शेवटची पोस्ट आहे ही ३६गुण ह्या आपल्या सिनेमा साठी. अजिबात दुःख नाही मला पण भयंकर शोकांतिका आहे ही असो.. काळजी घेऊया. मनापासून धन्यवाद माझे सगळे पत्रकार मित्र, तुम्ही मनापासून 36GunnFilm साठी लिहिलंत आणि प्रोत्साहन दिलं. आणि माझे मायबाप प्रेक्षक भेटू लवकरच, नवीन काहीतर करूयात असे संतोष जुवेकरने नमूद केले आहे.