Chetan Vadnere Instagram Followers: अप्पूच्या खडूसनं Instagram वर गाठला मोठा पल्ला; शेअर केली Special पोस्ट

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 26, 2022 | 10:03 IST

Thipkyanchi Rangoli Star Chetan Vadnere Shared New Post: ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरेनं सोशल मीडियावर नुकताच एक महत्त्वाचा पल्ला पार केला आहे.

Chetan Vadnere
अभिनेता चेतन वडनेरे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सध्या मराठी टीव्ही मालिकेतील (Marathi TV serial) कलाकार सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात.
  • मालिकेतील अप्पू आणि शशांकच्या (Appu and Shashank) जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
  • चेतननं स्वतः खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुंबई: Thipkyanchi Rangoli Star Chetan Vadnere: सध्या मराठी टीव्ही मालिकेतील (Marathi TV serial)  कलाकार सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. या कलाकारांचा लाखोंचा चाहता वर्ग सोशल मीडियावर आहे. स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी (thipkyanchi rangoli) या मालिकात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आवडत आहे. अशातच मालिकेतील अप्पू आणि शशांकच्या (Appu and Shashank)  जोडीलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरेनं सोशल मीडियावर नुकताच एक महत्त्वाचा पल्ला पार केला आहे. चेतनचे Instagram वर 100k फॉलोअर्स झाले आहेत. (100k followers on Instagram)

चेतननं स्वतः खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. शशांकनं 100 k फॉलोअर्सचा पल्ला गाठल्यावर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  आधीपासूनच शशांकची फॅन फॉलोविंग खूप आहे. त्यात आता आणखीन चाहत्यांची भर पडली आहे. 

अधिक वाचा-  गोळीबारानं हादरला 'हा' देश, संशयितासह तीन लोकांचा मृत्यू; इतर दोन जखमी

शशांकचे सोशल मीडिया अकाऊंट इस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटोंना चांगलीच पसंती मिळते. त्याच्या एकापेक्षा एक भारी फोटोंवर तरूणी घायाळ होत असतात. 

 

शशांकनं शेअर केली पोस्ट 

आजपर्यंत तुम्ही मला भरभरुन प्रेम दिलं. यापुढेही असंच माझ्यावर प्रेम करत रह', अशी पोस्ट शेअर करत चेतननं सर्व फॉलोअर्सचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे चेतननं त्याने रुबाबदार फोटो शेअर करत पोस्टच्या शेवटी 'सगळे फोटो संपले आता पुढे काय या विचारात, अशी तळटीप लिहिली आहे.

चेतनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास याआधी त्यानं फुलपाखरू, लेक माझी लाडकी, काय घडलं त्या रात्री या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी