Pradeep Patwardhan Died:''पटया मी तुला...'', 44 वर्षांपासून असलेल्या जीवलग मित्रासाठी प्रशांत दामलेंची Emotional पोस्ट

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 10:00 IST

Prashant Damale Emotional Facebook Post For Pradeep Patwardhan: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (veteran Marathi actor Pradeep Patwardhan) यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रशांत दामले यांनी इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

prashant damale facebook post
प्रशांत दामले यांची प्रदीप पटवर्धन यांच्यासाठी खास फेसबूक पोस्ट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
 • मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (veteran Marathi actor Pradeep Patwardhan) यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
 • प्रदीप यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
 • अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी ही आपल्या भावना सोशल मीडिया व्यक्त केल्या आहेत.

मुंबई: Prashant Damale Emotional Facebook Post: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (veteran Marathi actor Pradeep Patwardhan) यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काल गिरगाव (Girgaon) येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी (Marathi cinema)  गाजवली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची प्रतिक्रिया सगळीकडून येते. मराठी सिनेसृष्टीने एक हसरा चेहरा आणि अप्रतिम अभिनेता गमावला. प्रदीप यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अशात प्रदीप यांचे जुने मित्र आणि ज्यांनी एकत्र रंगभूमीवर काम केलेले अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी ही आपल्या भावना सोशल मीडिया व्यक्त केल्या आहेत. प्रशांत दामले यांनी इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 

प्रशांत दामले यांची इमोशनल पोस्ट 

सोशल मीडिया अकाऊंट फेसबूकवरून प्रशांत दामले यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दामले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, पट्या... प्रदीप पटवर्धन...मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या... सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालू राहणार. 

अधिक वाचा- कोल्हापुरात पावसाचं थैमान,पंचगंगेचं पाणी ही पात्राबाहेर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

पुढे त्यांनी लिहिलं की, मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. 
पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार. 

अभिनेते प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन यांची एकदम जुनी मैत्री होती. प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी एकत्रित काम केलं आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या गाजलेल्या मोरूची मावशी नाटकात प्रशांत दामले सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.  दोघांची मैत्री तब्बल 44 वर्ष जुनी आहे. प्रशांत दामलेंनी फेसबुकवर आपल्या जीवलग मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे.

कॉलेजच्या दिवसापासून असलेल्या आपल्या लाडक्या मित्राला प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त वाहिली. या पोस्टमधून त्यांना  आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

प्रदीप पटवर्धन यांचा अल्प परिचय 

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म 1 जानेवारी 1970 झाला. हे एक मराठी अभिनेते होते. प्रदीप पटवर्धन यांनी प्रामुख्याने मराठी सिनेमात काम केलं. 2019 ला प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार (Akhil Bharatiya Natya Parishad Award) मिळाला होता. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेनं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं. त्यांनी अनेक नाटकं आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. 

 प्रदीप पटवर्धन यांचे सिनेमे 

 • एक फुल चार हाफ (1991)
 • डान्स पार्टी (1995)
 • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)
 • गोळा बेरीज (2012) 
 • बॉम्बे वेल्वेट (2015)
 • पोलीस लाइन (2016) 
 • एक दोन तीन चार (2016) 
 • परीस 2013
 • थॅक यू विठ्ठला 2017
 • चिरनेर 2019

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी