sunny leone : सनी लियोनीच्या मधुबन मे राधिका नाचे रे गाण्यावर संत भडकले, बंदी आणण्याची केली मागणी

Mathura Priests Protest Against Sunny Leone's Dance On Madhuban Mein Radhika अभिनेत्री सनी लियोनीचे मधुबन हे गाणे नुकतच लॉन्च झाले आहे. परंतु या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मथुराच्या साधु संतांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांची मागणी मान्य न केल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा या संतांनी दिला आहे. या गाण्यामुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही संतांनी केला आहे. 

sunny leone
सनी लियोनी  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री सनी लियोनीचे मधुबन हे गाणे नुकतच लॉन्च झाले आहे.
  • या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
  • मथुराच्या साधु संतांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

sunny leone : मथुरा : अभिनेत्री सनी लियोनीचे मधुबन हे गाणे नुकतच लॉन्च झाले आहे. परंतु या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मथुराच्या साधु संतांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांची मागणी मान्य न केल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा या संतांनी दिला आहे. या गाण्यामुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही संतांनी केला आहे. (Mathura Priests Protest Against Sunny Leone's Dance On Madhuban Mein Radhika )

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीचे एक गाणे नुकतंच प्रदर्शित झाले आहे. मधुबन मे राधिका नाचे रे असे गाण्याचे शब्द असून या गाण्यावर सनी लियोनी अश्लील नृत्य करत असल्याचे मथुरेच्या संतांनी म्हटले आहे. सनीचे हे गाणे मागे घ्यावे तसेच तिने माफी मागावी अशी मागणी मथुरेच्या संतांनी केली आहे. तसेच तोपर्यंत सनीला भारतात राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये असेही संतांनी म्हटले आहे. वृदांवनचे संत नवल गिरी महाराज म्हणाले की, जर सरकारने सनीविरोधी कारवाई नाही केली तरी आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. 


युट्युबवर झाले गाणे लॉन्च

२२ डिसेंबर रोजी सनीचे मधुबन हे गाणे युट्युबवर लॉन्च झाले आहे. हे गाणे कृष्ण आणि राधाच्या प्रेमावर आहे, परंतु सनी ही या गाण्यात अश्लील डान्स करत असल्याचे संतांनी म्हटले आहे. सारेगमने हे गाणे प्रोड्युस केले असून या गाण्यात सनी आणि शिविका नाचताना दिसत आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरीग्राफी केली आहे. तीन दिवसांपूर्वी रीलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ८० लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

मोहम्मद रफीचे जुने गाणे
मूळ गाणे १९६० साली प्रदर्शित झालेल्या कोहिनूर चित्रपटातील आहे. या चित्रपटात दिलीप कुमार असून मोहम्मद रफी यांनी हे गाणे गायले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी