तब्बल सात दशकं दिमाखात उभं असलेल्या मुंबईतील चित्रा थिएटरला कायमचं टाळं लागणार

झगमगाट
Updated May 16, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai’s Iconic Chitra Theatre to Shut Permanently: मंबईच्या दादर विभागात असलेल्या चित्रा थिएटरची दारं अखेर कायमची बंद होणार आहेत. 7 दशकं दिमाखात उभं असलेल्या चित्रपटगृहात आज अखेरचा प्रयोग पार पडत आहे.

Mumbai’s iconic Chitra Theatre shutting down permanently after 7 decades
तब्बल 7 दशकं दिमाखात उभं असलेल्या चित्रा थिएटरला कायमचं टाळं लागणार  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: मुंबईचं प्रसिद्ध वातानुकूलीत थिएटर असलेलं चित्रा थिएटर बंद होणार आहे. मुंबईच्या दादर पूर्वेला असलेलं हे थिएटर 50च्या दशकात उभं राहीलं आणि गेली 7 दशकं अगदी दिमाखात यामध्ये चित्रपट दाखवत आहे. अनेक मोठ्या सिनेमांचे हाऊसफुल प्रयोग आणि अनेकदा रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करणारं हे थिएटर आता अखेर बंद होत आहे. चित्रपट या शब्दाला डोक्यात ठेवत थिएटरचं नाव चित्रा असं ठेवलं गेलं होतं. पण याच चित्रपटांची प्रगती होत आता मल्टिप्लेक्सचा जमाना आलाय आणि तिथे मात्र हे सिंगल स्क्रिन थिएटर तग धरु शकत नाहीये. त्यामुळेच नाईलाजाने थिएटरला टाळं लावायची वेळ सध्याचे मालक दारा मेहता यांच्यावर ओढवली आहे. आज स्टुडंट ऑफ द इअर 2 सिनेमाचा शेवटच्या शोनंतर थिएटरला कायमचं टाळं लागणार आहे असं समजतंय.

1982 साली आपले वडिल पी डी मेहता यांच्यानंतर सध्याचे मालक दारा मेहता यांनी व्यवसायाचा कारभार सांभाळायला सुरुवात केली. आज जिथे टायगर श्रॉफच्या सिनेमाचा शेवटचा प्रयोग थिएटरमध्ये रंगणार आहे तिथेच योगायोगाने 1983 साली टायगरचे वडिल अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हिरो सिनेमाने थिएटरला बरेच हाऊसफुल शो देत प्रचंड कमाई करुन दिली होती. तिथेच 1961 साली रिलीज झालेल्या जंगली सिनेमाने तब्बल 25 आठवडे या थिएटरमध्ये राज्य केलं.

यासोबतच इतरही बरेच सिनेमे या सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये गाजले. पण मल्टीप्लेक्स आली आणि सिंगल स्क्रिन थिएटरची अवस्था बिकट झाली. हिच गत चित्राची सुद्धा झाली आहे. जिथे विकेन्डला थिएटरमध्ये बऱ्यापैकी गर्दी होते तिथे इतर दिवशी मात्र तेवढी कमाई किंवा गर्दी होताना दिसत नाही ओघाने मालक मेहता यांना त्यामुळे नुकसान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर सुद्धा याबद्दल दुःख व्यक्त होताना दिसलं.

550 जणांची मर्यादा असलेल्या या थिएटरने सिनेमांचा सुवर्ण काळ अनुभवला. दादरच्या प्लाझाने जिथे कायम मराठी सिनेमांवर भर दिला तिथे चित्राने कायम हिंदीवर जोर दिला आहे. अनेकांना माहिती नसेल पण या थिएटरमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात, वरच्या बाजूला एक मिनी थिएटर सुद्धा होतं. आता अनेक थिएटरमध्ये अशी मिनी थिएटर असली तरी त्या काळी हे फारंच नवीन होतं. या थिएटर जवळ असलेल्या रणजीत, रुपतारा आणि श्री साऊंड या तिन्ही स्टुडिओजना या मिनी थिएटरचा खूप फायदा होत असे. 70-80च्या दशकात या मिनी थिएटरमध्ये अनेक सिनेमांचे खास प्रयोग आयोजित केले जात असत. हा आणि असा सुवर्ण इतिहास असलेलं हे सिनेमांचं वारसा असलेलं थिएटर बंद होतंय ही फारच वाईट गोष्ट आहे. सध्यातरी इथे मल्टिप्लेक्स बांधावं का ते रिडेव्हेलपमेन्टला द्यावं यावर कोणताही विचार केला नसल्याचं थिएटरचे मालक दारा यांचं म्हणणं आहे. तरी आज शेवटचा शो संपताच चित्रा थिएटरला कायमचं टाळं ठोकलं जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
तब्बल सात दशकं दिमाखात उभं असलेल्या मुंबईतील चित्रा थिएटरला कायमचं टाळं लागणार Description: Mumbai’s Iconic Chitra Theatre to Shut Permanently: मंबईच्या दादर विभागात असलेल्या चित्रा थिएटरची दारं अखेर कायमची बंद होणार आहेत. 7 दशकं दिमाखात उभं असलेल्या चित्रपटगृहात आज अखेरचा प्रयोग पार पडत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स