मुंबई : जन्नत झुबैर रेहमानी हे नाव टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी नवीन नाही. चाईल्ड आर्टिस्ट म्हणून टीव्हीवर काम सुरू केलेली जन्नत फक्त टीव्हीवरच नव्हे तर, सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिच्या टिकटॉक व्हिडिओनाही प्रचंड प्रतिसाद मिळतो. टाइम्स म्युझिक आणि स्पीड रेकॉर्ड्सनं सादर केलेला ‘डाऊन टाऊन वाल गेडिया’ हा म्युझिक व्हिडिओ रिलिज झाला असून, त्याच्या गाण्यात गॉर्जिअस जन्नतला पाहायला मिळत आहे. जन्नतनं नुकताच्या तिच्या इन्सटाग्रामवर हे गाणं शेअर केलं असून, ‘डाऊन टाऊन वाल गेडिया’ फायनली रिलीज झाल्याचं म्हटलंय. वेस्टर्न पेंडुझ या अनोखं म्युझिक सादर करणाऱ्या ग्रुपनं हे पंजाबी लव्ह साँग दिलंय. अर्थातच ते ठेका धरायला लावणारं आहे. जन्नत सोबत या गाण्यात मिस्टर डी दिसत आहे. टाइम्स म्युझिक आणि स्पीड रेकॉर्ड्सचं हे एक्सक्लुझिव्ह म्युझिक साँग तुम्हाला यूट्यूबवर पहायला आणि गाना डॉटकॉमवर ऐकायला मिळणार आहे.
वेस्टर्न पेंडुझ कायमच नाविन्याचा ध्यास घेऊन काम करतात. त्यांचं पंजाबी म्युझिक तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ‘डाऊन टाऊन वाल गेडिया’ हे गाणं मिस्टर डीनेच गायले आहे आणि जन्नतसोबत तोच या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका फॉरेन लोकेशनवर शूट केलेल्या या गाण्यात एकमेकांच्या प्रेमात पडलेले दोघेजण त्यांची भावना व्यक्त करतात की नाही, याची उत्सुकता वाढवण्यात आली आहे. गाण्यात जन्नत खूपच सुंदर दिसत आहे. अर्थात तिच्या सौंदर्यावर फिदा असणाऱ्यांची संख्या कमी नाही. कलर्स टीव्हीवरच्या फुलवा मालिकेतून तिनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलंय. गेली जवळपास दहा वर्षे ती छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करत आहे. राणी मुखर्जीच्या हिचकी सिनेमातही तिनं लक्षवेधी भूमिका केली होती.
जन्नत सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला जवळपास ९० लाख फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरचे तिचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात जन्नत सध्या सोशल मीडियावरील तिच्या फॉलोअर्सच्या माध्यमातून ती काही प्रोडक्टच्या जाहिरातीही करताना दिसते. तिच्या चाहत्यांची संख्या इतकी मोठी आहे की, तिच्या ‘डाऊन टाऊन वाल गेडिया’ गाण्याच्या छोट्याशा व्हिडिओला इन्स्टाग्रामवर सात लाखांहून अधिक व्हूज् मिळाले आहेत. याबाबत जन्नत म्हणाली, ‘जेव्हा मला या गाण्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा गाणं ऐकता क्षणी प्रेमात पडल्यासारखं झालं. गाण्याचे बोल, आवाज, ठेका सगळं काही परफेक्ट आहे. शुटिंग करतानाही खूप मजा आली. हा खूप चांगला अनुभव होता.’ वेस्टर्न पेंडुझ म्हणाले, ‘जीम, गाडीत, पार्टीत कोठेही ऐकलं जाईल, असं संगीत तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्हाला लव्ह साँग करायला आवडतात. आम्ही असे खूप अपबिट ट्रॅक केले आहेत भविष्यातही तसेच करायला आवडतील.’