प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह, हर्षच्या घरात मिळाला गांजा, भारतीला NCBने केली अटक

NCB raid in Mumbai: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांच्या मुंबईतील घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. 

Narcotics Control Bureau conducts a raid at the residence of comedian Bharti Singh in Mumbai
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष यांच्या घरी NCBचा छापा (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • ड्रग्जप्रकरणी भारती सिंह आणि हर्ष एनसीबीच्या रडारवर 
  • एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा परिसरात छापेमारी 

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील एकामागोमाग एक कलाकार हे एनसीबी(NCB)च्या रडारवर येत आहेत. आता एनसीबी अर्थात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau)ने प्रसिद्द कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष यांच्या मुंबईतील घरी छापा टाकला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. भारती सिंह आणि हर्ष यांच्या घरी छापा टाकल्याची माहिती स्वत: एनसीबीने दिली आहे. ही कारवाई नेमकी का करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्र्ग्ज प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एनसीबीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांचीही चौकशी सुरू केली. चौकशीनंतर एनसीबीने भारती सिंहला अटक केली आहे.

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला आणि त्यांच्या घरातून ८६.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी भारती सिंहला एनसीबीने अटक केली आहे तर हर्षची अद्याप चौकशी सुरू आहे अशी माहिती एएनआयने एनसीबीच्या हवाल्याने दिली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्जचा अँगल समोर आला. यानंतर एनसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली. सर्वात आधी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावावर एनसीबीने कारवाई केली. रिया आणि तिच्या भावाला कारागृहात जावं लागलं. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना एनसीबीने समन्स पाठवले तर काहींना चौकशीसाठी बोलवले.

अर्जुन रामपालही एनसीबीच्या रडारवर

बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमधील कथित संबंधाचा तपास एनसीबीकडून करण्यात येत आहे. या संदर्भात अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची सहा तास चौकशी केली होती. तर अर्जुल रामपालला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर अर्जुन रामपाल याचीही एनसीबीने चौकशी केली. याआधी अर्जुनचा मित्र पॉल बर्टेलला एनसीबीने अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी