Arangetram Ceremony of Mukesh Ambani’s daughter in law : अंबानीच्या होणाऱ्या सुनेची अरेंगेत्रम सेरेमनी, अनेक दिग्गजांनी केलं टाळ्यांच्या गजरात कौतुक

मुकेश आणि नीता अंबानी यांची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट हिचा 'अरेंगेत्रम सेरेमनी' नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.

Arangetram of Radhika Merchant
अंबानींच्या भावी सुनेचा भरतनाट्यम परफॉर्मन्स  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • राधिका मर्चंटची 'अरेंगेत्रम' सेरेमनी
  • राधिका ही मुकेश अंबानींची होणारी धाकटी सून
  • अंबानी दांपत्याने आयोजित केलेल्या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

Arangetram Ceremony of Mukesh Ambani’s daughter in law | कोरोनामुळं मुंबईतील (Mumbai) सांस्कृतिक कार्यक्रमांची (Cultural Programmes) रेलचेल काहीशी कमी झाली होती. मात्र नुकताच झालेला एक भरतनाट्यमचा (Bharat Natyam) कार्यक्रम केवळ मुंबईतच नव्हे तर देशभर चर्चेचा विषय राहिला. हा परफॉर्मन्स केला भरतनाट्यम नृत्यांगना राधिका मर्चंट हिने. आपलं भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने हा ‘अरेंगेत्रम’ सादर केला. 

अंबानींची होणारी सून

राधिका मर्चंट ही भारतीय शास्त्रीय नृत्यांगना तर आहेच, शिवाय मुकेश आणि नीता अंबानी यांची होणारी सूनही आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटे मुलगा अनंत अंबानीसोबत लवकरच ती विवाहबद्ध होणार आहे. तिचं भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झाल्याची बाब सेलिब्रेट करण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनीच तिच्या ‘अरेंगेत्रम’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज आणि सेलेब्रिटींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. अभिनेता सलमान खान, रणवीर सिंह यांच्यासह अनेक सेलेब्रिटी या कार्यक्रमाला हजर होते. 

प्रेक्षकांनी केली गर्दी

राधिक मर्चंटला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला होता. अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले. शिवाय कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बहुतांश पाहुणे हे पारंपरिक पेहरावात कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. या कार्यक्रमात कोव्हिड प्रोटोकॉलचं काटेकोर पालन करण्यात आलं. सर्व पाहुण्यांची अगोदर कोरोना चाचणी करण्यात आली आणि मगच त्यांना कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. 

अधिक वाचा - बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र

राधिकाचा जोरदार परफॉर्मन्स

राधिका मर्चंटने आपलं पूर्ण कसब पणाला लावत जोरदार परफॉर्मन्स केला. तिचा डान्स पाहून तिच्या भरतनाट्यम गुरू भावना ठाकर यांचेही डोळे पाणावले. गेल्या 8 वर्षांपासून राधिकाला भरतनाट्यम शिकवणाऱ्या आणि तिला अरेंगेत्रमसाठी तयार करणाऱ्या गुरु ठाकर यावेळी भलत्याच खूष दिसल्या. 

अरेंगेत्रम म्हणजे काय?

भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अरेंगेत्रम कार्यक्रम सादर केला जातो. अगदी शालेय वयात भरतनाट्यमचं शिक्षण सुरू होतं आणि शेवटची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत ते सुरू असतं. शेवटची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं भरतनाट्यम प्रशिक्षण पूर्ण होतं. विद्यार्थ्याला त्याची कला आणि कसब इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी अरेंगेत्रम कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. 

अधिक वाचा - शाहरूख खान आणि कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

कुटुंबातील दुसरी भरतनाट्यम डान्सर

राधिका मर्चंट ही अंबानी कुटुंबातील दुसरी भरतनाट्यम नृत्यांगना ठरणार आहे. नीता अंबानी या स्वतः एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत त्या भरतनाट्यम सादरीकरणासाठी वेळ काढत असतात. राधिकाच्या डान्समध्येही सर्व पारंपरिक बाबींचा समावेश होता. तिचा फरफॉर्मन्स झाल्यानंतर सर्वांनीच जोरदार टाळ्या वाजवत तिचं अभिनंदन केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी