NO WI-FI व्हेकेशनमध्ये रोमान्स, कौशल दिसला शर्टलेस, कतरिनाची बिकिनीमध्ये हॉट स्टाईल...

Vicky Kaushal And Katrina Kaif Romantic Vacation Pictures: कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच कामातून मोकळे झाल्यानंतर सुट्टीवर गेले होते. विकी कौशलने इंस्टाग्रामवर कतरिना कैफसोबतच्या व्हेकेशनचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

NO WI-FI Vacation Romance, Skill Shown Shirtless, Katrina Shows Hot Style In Bikini ...
NO WI-FI व्हेकेशनमध्ये रोमान्स, कौशल दिसला शर्टलेस, कतरिनाने दाखवला बिकिनीमध्ये हॉट स्टाइल...   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच कामातून फ्री झाल्यानंतर सुट्टीवर गेलेत.
  • दोघे सुट्टीतील रोमँटिक फोटो शेअर करत आहेत.
  • विकीने मजेशीर पद्धतीने कॅप्शन लिहिले पण चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

मुंबई: विकी कौशल कतरिना कैफ बॉलिवूडचे नवीन पॉवर कपल मानले जाते. सध्या ते दोघेही वेकेशनवर आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न झाले होते. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर पती विकी कौशलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल होत आहेत. वास्तविक, हे कपल आपल्या कामातून थोडा वेळ काढून खास सुट्टीवर गेले होते आणि तिथले काही खास फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

अधिक वाचा : Tejasswi Prakash: बिग बॉस विनर तेजश्रीचा ग्लॅमरस अंदाज; फक्त कोट घालून लावली पार्टीला हजेरी 

विकी कौशलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यात सुंदर सूर्यास्ताचा फोटो शेअर केला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या सुट्टीत रोमँटिक वेळ घालवत आहेत. त्याचवेळी कतरिना कैफने हे फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केले आहेत, फक्त इमोजी शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विकी कौशल कतरिना कैफच्या मांडीवर डोकं ठेवून बसलेला दिसतोय तर दुसऱ्या फोटोत कतरिना कैफ एकटी दिसत आहे. इतकेच नाही तर तिसर्‍या फोटोत एक सुंदर झोपडी दाखवण्यात आली आहे. अशा प्रकारे हे दोघेही प्रेक्षणीय दृश्यांमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत.

अधिक वाचा : Lock Upp: 'लॉक अप' हिट झाल्यानंतर कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा; म्हणाली- तुझे रडण्याचे दिवस आले

विकी कौशलने कतरिना कैफसोबतच्या व्हेकेशनचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर त्याने लिहिले, "वाय-फाय कनेक्शन नाही, दुसरे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहे." विकी कौशलचे हे कॅप्शन वाचल्यानंतर चाहत्यांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

वर्क फ्रंटवर, विकी कौशल लवकरच 'गोविंदा नाम मेरा' आणि 'साम बहादूर'मध्ये दिसणार आहे. नुकतेच त्याने सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. कतरिना कैफबद्दल बोलायचे झाले तर ती 'टायगर 3' आणि 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी