पाकिस्तानी गायिकेचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

झगमगाट
Updated Nov 03, 2019 | 15:20 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Pakistani singer Rabi Pirzada: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी पाकिस्तानी गायिका रबी पीरजादा हिचे कथित अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

nude photos videos pakistani singer rabi peerzada viral social media threatened narendra modi news in marathi
पाकिस्तानी गायिकेचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानी गायिकेचे न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल
  • फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
  • रबी पीरजादा पाकिस्तानमधील पॉप गायिका

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील पॉप-सिंगर रबी पीरजादा हिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहेत. रबी पीरजादाचे न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच तात्काळ ट्विटर युजर्स रबी पीरजादा हिच्या समर्थनात उतरले आणि हे फोटो, व्हिडिओ फॉरवर्ड, शेअर्स न करण्याची विनंती त्यांनी केली आहे. याच दरम्यान अनेक ट्विट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांच्यासोबत रबी पीरजादाचा वाद झाल्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.एका युजरने लिहिलं आहे की, 'आयटम साँग विरोधात बोलल्यावर गायिका रबी पीरजादाने त्यावर भाष्य केलं होतं. तसेच मेजर जनरल आसिफ गफूर यांच्यावर टीकाही केली होती. त्यानंतर रबी पीरजादाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या घटनेप्रकरणी सर्वांनाच पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांच्यावर संशय आहे'.
तर, काहींनी दावा केला आहे की, गायिका रबी पीरजादा हिच्या आधीच्या बॉयफ्रेंडने हा व्हिडिओ लीक केला आहे. या संपूर्ण वादात ट्विटर युजर्स दोन गटांत विभागले गेले असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात रबी पीरजादा हिचा एक्स बॉयफ्रेंड हा मुख्य संशयित मानला जात आहे.

पाकिस्तानमधील पॉप गायिका रबी पीरजादा हिने काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली होती. इतकंच नाही तर रबी पीरजादा हिने मोदींची तुलना हिटरलसोबतही केली होती. मोदींना धमकी देणाऱ्या व्हिडिओत  रबीच्या हातात साप दिसत आहे तसेच तिच्या समोर मगरही दिसत आहे. गायिका रबी पीरजादा हिने मोदींना धमकी दिल्यानंतर सोशल मीडियात तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी